लंडन येथे सर्वात उंच व सर्वात बुटक्‍या महिलेची भेट झाली Image Source X
आंतरराष्ट्रीय

...जेव्हा सर्वात उंच महिला सर्वात बुटक्‍या महिलेला भेटते !

World's Tallest and Shortest Woman's | गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे निमित्त दोघींची भेट

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

जगातील सर्वाधिक उंची असलेली महिला व जगातील अंत्‍यत बुटकी असलेली महिला यांची भेट होणे तसा दुर्मिळ योग. पण हा योग घडवून आणला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी. निमित्त होते वर्ल्ड रेकॉर्ड डे चे. जगातील सर्वात उंच तुर्की देशाची रुमेसा गेल्‍गी व जगातील सर्वात बुटकी भारताची ज्‍योती आमगे या दोघींची भेट लंडन येथे झाली. २१ नोव्हेंबर हा गिनिज र्ल्ड रेकॉर्ड डे साजरा केला गेला. यानिमित्ताने या दोघींची भेट घडवून आणण्यात आली.

तुर्की देशाची असलेली रुमेसा गेल्‍गी हिची उंची 7.71" इतकी आहे. ती व्यवसायाने वकील आहे. तिला जगातील सर्वात उंच महिला असा किताब मिळाला आहे. तर भारतातील नागपूर येथील ज्‍योती आमगे यांची उंची 2.7" इतकी आहे. ही जगातील सर्वात कमी उंचीची महिला आहे. या दोघींची प्रथमच भेट झाली आहे. ‘जगातील सर्वात उंच महिलेला भेटून आनंद झाला’ अशी प्रतिक्रीया आमगे यांनी दिली. तर ‘सुस्‍वभावी महिलेबरोबर मला खूप कम्‍फर्टेबल वाटले’ अशी प्रतिक्रीया गेल्‍गी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT