पुढारी ऑनलाईन डेस्क : तालिबानने अफगाणिस्तानमधील पोलिओ लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी आज (दि.१६सप्टेंबर) दिली. याबाबते वृत्त APने दिले आहे. अफगाणिस्तानातील पोलिओ निर्मूलनासाठी मोठा धक्का आहे. मोहिमेला कोणत्या कारणास्तव स्थगिती दिली याचे कारण तालिबान सरकारने स्पष्ट केलेले नाही. ( Taliban have suspended polio vaccination campaigns ) दरम्यान, पोलिओचा सर्वाधिक धोका असणार्या दोन देशांपैकी अफगाणिस्तान एक आहे. तर दुसरा देश पाकिस्तान आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षी अफगाणिस्तानमध्ये १८ पोलिओ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. २०२३ पेक्षा सहा अधिक प्रकरणे आढळली आहेत. जागतिक पोलिओ निर्मूलन पुढाकार अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये घरोघरी पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्याबाबत चर्चा झाली हाेती," असे WHO मधील डॉ. हमीद जाफरी यांनी सांगितले.
शेजारच्या पाकिस्तानमध्ये पोलिओविरोधी मोहिमेवर नियमितपणे हिंसाचार होत असतो. अतिरेकी लसीकरण पथके आणि त्यांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या पोलिसांना लक्ष्य करतात, मुलांची नसबंदी करण्याचा पाश्चात्य कट असल्याचा खोटा दावा करत पोलिओ मोहिमेला विरोध केला जातो.
अफगाणिस्तानमध्ये देशव्यापी पोलिओ निर्मूलन मोहिम जून २०२४ मध्ये राबवली गेली. अफगाणिस्तानने पाच वर्षांत प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबवली गेली. याचा फायदा बहुसंख्य मुलांना झाला. दक्षिण कंदाहार प्रांत, तालिबानचा म्हाेरक्या हिबतुल्ला अखुंदजाद याचा तळ, मशिदी-ते-मशीद लसीकरण मोहिम राबवली गेली. लसीकरण मोहिमेमध्ये एकूण महिलांचा समावेश अफगाणिस्तानमध्ये सुमारे वीस टक्के आहे,", असे WHO ने म्हटले आहे." दरम्यान, पोलिओचा सर्वाधिक धोका असणार्या दोन देशांपैकी अफगाणिस्तान एक आहे. तर दुसरा देश पाकिस्तान आहे. पाकिस्तानमध्येही पोलिओविरोधी मोहिमेवर नियमितपणे हिंसाचार होत असतो. अतिरेकी लसीकरण पथके आणि त्यांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या पोलिसांना लक्ष्य करतात.