भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या वर्षी ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेली होती Pudhari
आंतरराष्ट्रीय

गूड न्‍यूज...अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची 'घरवापसी' लवकरच!

नासाने जाहीर केले नवीन वेळापत्रक, मागील आठ महिन्‍यांपासून आहेत अंतराळात

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स ( Sunita Williams) या गेल्या वर्षी ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेल्‍या हाेत्‍या. तेव्हापासून त्‍या तिथेच अडकल्‍या आहेत; पण आता 'नासा'ने सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतण्याबाबत एक गूड न्‍यूज दिली आहे. नासाने म्हटले आहे की, "अंतराळवीर सुनीता आणि बुच विल्मोर यांना अपेक्षेपेक्षा काही दिवस आधीच अंतराळातून परत आणले जाईल."

नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर यांना घेवून बोइंग कंपनीचं ‘स्टारलायनर’ अंतराळयान ५ जून २०२४ रोजी अवकाशात झेपावलं होतं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून एक किंवा दोन आठवड्यांत ते परततील, अशी अपेक्षा नासाने व्यक्त केली होती. मात्र, आठ महिने उलटले तरी अद्याप ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतलं नाही.

मार्चमध्‍येच पृथ्‍वीवर परतणार

नासाने म्‍हटलं आहे की, स्पेसएक्स अंतराळवीर उड्डाणांसाठी कॅप्सूलची जागा घेईल. बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या ऐवजी मार्चच्या मध्यात घरी परत आणता यावे म्हणून हा बदल करण्यात आला आहे. दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मुक्काम दोन आठवड्यांनी कमी होईल.

नासा काय म्हणाले ?

नासाने म्हटले आहे की, सुनीता विल्यम्स आणि बुच बिल्‍मोर हे अपेक्षेपेक्षा लवकर परत येतील. आता त्यांना आणण्यासाठी १२ मार्च रोजी कॅप्सूल लाँच केले जाईल. स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूल बदलण्याचा पर्याय निवडल्यामुळे अंतराळवीरांना परत आणण्‍यासाठी नवीन वेळापत्रक तयार करण्‍यात आले आहे. आता कॅप्सूल १२ मार्च रोजी "मिशनच्या तयारीच्या अधीन" लाँच होईल. याचा अर्थ असा की, नवीन तारीख विल्यम्स आणि विल्मोरच्या नियोजित परतीच्या दिवसांच्या आधीची असण्याची शक्यता आहे. दरम्‍यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्याचे मिशन लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT