अमेरिकेतील केंटकी येथे पुरामुळे निर्माण झालेले परिस्थिती.  Pudhari photo
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत वादळामुळे आलेल्या महापुरात ९ जणांचा मृत्यू

घटनास्थळी बचावकार्य सुरु

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील केंटकीमध्ये एका शक्तिशाली वादळामुळे अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, असे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी सोमवारी सांगितले. 'सीएनए'नने दिलेल्या वृत्तानुसार, आपत्कालीन सेवा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत आणि २४ तासांपेक्षा कमी कालावधीत १,००० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांनी वादळाचे वर्णन "गेल्या दशकात आपण अनुभवलेल्या सर्वात गंभीर हवामान घटनांपैकी एक" असे केले.

अनेक घरे पाण्याखाली

या झालेल्या वादळामध्ये विविध राज्यांमधील व्हिडिओ फुटेजमध्ये पाण्याखाली गेलेली वाहने, पडलेली झाडे आणि पाण्याखाली गेलेली घरे दाखवण्यात आली आहेत, तसेच टेनेसी, केंटकी आणि व्हर्जिनियामध्ये पुरामुळे रस्ते, व्यवसाय आणि घरे बाधित झाल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी झालेल्या वादळानंतर केंटकीमध्ये पाण्याची पातळी उच्चांकावर पोहोचली आहे.

गव्हर्नर बेशियर यांची नागरिकांना विनंती

अँडी बेशियर यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, "आम्ही केंटकीवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो. ३०० हून अधिक रस्ते बंद आहेत. पूर्वेकडील भागापासून ते पश्चिमेकडील हिमवादळांपर्यंत, परिस्थिती धोकादायक आहे. कृपया प्रवास टाळा आणि सुरक्षित रहा, केंटकी."

मदत कार्यात गुंतले सैनिक आणि हवाई दलाचे जवान

केंटकी आपत्कालीन व्यवस्थापन संचालक एरिक गिब्सन म्हणाले की, ही तीव्र हवामान घटना "आणखी काही दिवस सुरू राहील." बेशियर यांनी येत्या काही दिवसांत पुराचा इशारा दिला. त्यांनी सांगितले की फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीचे अधिकारी केंटकीमध्ये आहेत, त्यांच्यासोबत केंटकी नॅशनल गार्डचे १४६ सैनिक आणि हवाई दलाचे जवान मदत कार्यात मदत करत आहेत. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सोमवारपर्यंत वादळ संपण्याची आशा

अटलांटा येथील ग्रोव्ह पार्क परिसरात "जोरदार वादळ" सुरू असताना एका घरावर मोठे झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अटलांटा अग्निशमन दलाचे कॅप्टन स्कॉट पॉवेल म्हणाले की, अग्निशमन दलाला सकाळी ५ वाजण्याच्या आधी फोन आला आणि त्यांना घरात एक व्यक्ती अडकलेली आढळली. सोमवारपर्यंत वादळ थांबण्याची अपेक्षा आहे, परंतु त्यानंतर ग्रेट लेक्सच्या काही भागात तलावातून होणारी हिमवृष्टी होऊ शकते. अमेरिकेतील १ कोटींहून अधिक लोक अजूनही हिवाळ्यातील वादळाच्या धोक्याखाली आहेत, जो सोमवार सकाळपर्यंत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT