वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन
अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दातार हे मावळते डीन नितीन नोहरिया यांची जागी घेणार आहेत. दातार हे बिझनेस स्कूलचे ११ डीन आहेत. भारतीय वंशाचे नोहरिया यांनी २०१० ते २०२० दरम्यान बिझनेस स्कूलचे डीन म्हणून काम पाहिले. आता सलग दुसऱ्यांदा ११२ वर्ष जुन्या हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे. ते १ जानेवारी पदभार स्वीकारणार आहेत. याबाबतची माहिती हार्वर्ड विद्यापीठाच्या अध्यक्ष लॅरी बॅकोव यांनी दिली आहे.
वाचा : ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही : उद्धव ठाकरे
श्रीकांत दातार हे एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी शैक्षणिक नेते आहेत," असे बॅकोव यांनी दातार यांची नियुक्ती जाहीर करताना म्हटले आहे. ते मोठे विचारवंत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
हार्वर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन म्हणून श्रीकांत दातार यांची निवड योग्य असल्याचे मावळते डीन नोहरीया यांनी म्हटले आहे.
वाचा : परदेशी कार्यक्रम पाहिल्यास उत्तर कोरियात क्रूर शिक्षा
दातार यांनी मुंबई विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आहे. १९७३ मध्ये ते विद्यापीठातून उत्तीर्ण झाले. चॉर्टर्ड अकाउटंट बनल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयांतून पीएचडीचे शिक्षण घेतले.