SpaceX Starship rocket |मस्क यांचे 'स्टारशिप रॉकेट बूस्टर' अवकाशात झेपावताच बेचिराख प्रातिनिधिक फोटो
आंतरराष्ट्रीय

मस्क यांच्या 'SpaceX'चे 'स्टारशिप रॉकेट बूस्टर' अवकाशात झेपावताच बेचिराख

SpaceX Starship rocket | 'यश अनिश्चित, पण मनोरंजनाची पूर्ण हमी'...! 'स्टारशिप'च्या अपयशावर मस्क यांची प्रतिक्रिया

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: SpaceX Starship rocket | एलन मस्क स्पेस एक्सचे (SpaceX) स्टारशिप (Starship) रॉकेट बूस्टर प्रक्षेपित (लॉन्च) होताच, अवकाशात त्याचा स्फोट झाला. स्फोटानंतर हे रॉकेट बेचिराख (SpaceX Starship rocket explodes after launch) झाले अन् त्याचे तुकडे अवकाशात पसरले आणि काही काळानंतर ते जमीनीवर कोसळले. स्पेसएक्सच्या स्टारशिपचे सातव्यांदा चाचणी करताना ही घटना घडली. पृथ्वीवर कोसळणारा रॉकेटचा हा कचरा जणू काही उल्कावर्षावासारखा दिसत होता. या घटनेचा व्हिडिओ स्वत: स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क यांनी शेअर केला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

'स्टारशिप रॉकेट'चा स्फोट व्हिडिओ व्हायरल

टेस्ला, स्पेस एक्स आणि एक्स या कंपन्यांचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलन मस्क यांनी स्टारशिप रॉकेट बूस्टरच्या अपयशाचा आणि त्याच्या स्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि चर्चेचा विषय बनला आहे. आतापर्यंत मस्क यांनी शेअर केलेला व्हिडिओ ४.५ कोटी वेळा पाहिले गेले आहे.

'यशाची नाही, पण मनोरंजनाची पूर्ण हमी'; मस्क यांची प्रतिक्रिया 

या व्हिडिओशी संबंधित सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे व्हिडिओसोबत एलन मस्क यांनी दिलेले कॅप्शन. रॉकेट बूस्टरच्या ढिगाऱ्याखाली पडण्याचा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिले आहे की, "यश निश्चित नाही, पण मनोरंजनाची हमी आहे". मस्क यांनी या अपयशाचा मजेदार पद्धतीने आनंद घेतला आहे आणि या घटनेचा एक रोमांचक व्हिडिओ शेअर केला आहे.

अवकाशातून जणू तारेच जमिनीवर पडतायत

या व्हिडिओमध्ये, एक रॉकेट आकाशात उंच उडताना दिसत आहे आणि अचानक स्फोटाने त्याचे तुकडे होतात. मग हा कचरा शेकडो तुकड्यांमध्ये मोडतो आणि पृथ्वीकडे येऊ लागतो. हे दृश्य असे दिसते की, जणू काही तारे तुटून जमिनीवर पडत आहेत. हे खरोखरच एक अद्भुत दृश्य होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT