Setback for SpaceX Starship rocket's double-catch test इलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीने स्टारशिप लाँचर हे अत्याधुनिक रॉकेट लाँचर आहे जे स्पेस क्राप्फ अवकाशात लाँच करुन परत हवेत पकडते. अन्य कंपन्याची रॉकेट लाँचर हे उपग्रहाला पृथ्पीच्या कक्षेबाहरे लाँच केल्यानंतर ते समुद्रात किंवा वाळवंटात पाडले जाते. पण इलॉन मस्कच्या स्पेस एक्स ने प्रत्येक वेळी हे नुकसान टाळण्यासाठी असे अत्याधुनिक लाँचर तयार केले होते. पण शुक्रवारी दुपारी टेक्सास येथून आपल्या महाकाय 'स्टारशिप' (Starship) रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. पुनर्वापर करता येण्याजोग्या या रॉकेटचे दोन्ही भाग एकाच वेळी हवेत झेलून (डबल कॅच) इतिहास रचण्याचा कंपनीचा मानस होता, मात्र हे लक्ष्य पूर्ण होऊ शकले नाही.
४०७ फूट उंचीचे हे जगातील सर्वात मोठे रॉकेट २२ तासांच्या कालावधीत पृथ्वीभोवती सुमारे १४ प्रदक्षिणा घालणार आहे. स्टारशिपचे हे १५ वे उड्डाण असून ते दोन भागांत विभागलेले आहे: खालच्या बाजूला असलेला 'सुपर हेवी' बूस्टर (ज्यामध्ये प्रक्षेपणावेळी प्रज्वलित होणारी ३३ रॅप्टर इंजिने आहेत) आणि वरच्या बाजूला असलेले 'स्टारशिप' यान. अशी याची रचना होती त्यानंतर दक्षिण टेक्सासमधील 'स्टारबेस' येथील लाँचपॅडवर हे रॉकेट पुन्हा पकडले जाणार होते. पण ते कोसळले यातील वरचा भाग अजून प्रदक्षिणा घालत आहे.
याच्या लाँचिगवेळी प्रक्षेपण स्थळावरून धुराचे लोट उसळताच स्पेसएक्सच्या कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. रॉकेटचे दोन्ही भाग लाँच टॉवरवर परत आणण्याचे कंपनीचे नियोजन होते. परंतु, 'सुपर हेवी' बूस्टरचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले आणि ते मेक्सिकोच्या आखातात ब्लास्ट होऊन कोसळले. हा मार्ग बदलण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पृथ्वीवर परतताना लाँच टॉवरवरील 'चॉपस्टिक्स' नावाच्या यांत्रिक हातांच्या मदतीने हा भाग पकडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट होते. मात्र, त्याऐवजी तो समुद्राकडे वळवण्यात आला आणि खाली येताना त्याने पेट घेतला. रॉकेटचा वरचा भाग सध्या अंतराळातील आपला प्रवास पुढे सुरू ठेवत आहे. रॉकेटचा हा टप्पा हवेत झेलण्याचा प्रयत्न करायचा की नाही, याचा निर्णय स्पेसएक्सने अजून घेतलेला नाही.
आपले रॉकेट पूर्णपणे परत मिळवण्याचा या अंतराळ संशोधन कंपनीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यामुळे स्टारशिप पूर्णपणे पुनर्वापर करण्यायोग्य बनवण्याचा मार्ग मोकळा होईल, ज्यामुळे ते वारंवार उड्डाण करू शकेल आणि प्रवासाचा खर्चही कमी होईल.
"आज आम्हाला जी बातमी ऐकायची होती, ती नक्कीच चांगली नाही," अशी प्रतिक्रिया स्पेसएक्सच्या गुणवत्ता व्यवस्थापन संचालिका केट टाईस यांनी दिली. मात्र, बूस्टरचे समुद्रात उतरणे हे कडक सुरक्षा नियमांनुसारच झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रक्षेपणाच्या सुरुवातीला कंपनीने रॉकेट परत कसे पकडले जाईल याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. लाँच टॉवरच्या 'चॉपस्टिक' सारख्या यांत्रिक हातांनी संपूर्ण रॉकेट हवेत झेलले जाणे अपेक्षित होते. नोव्हेंबरच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांनी या 'डबल कॅच' तंत्रज्ञानाचे वर्णन "इतर ग्रहांवर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा टप्पा" असे केले होते, परंतु शुक्रवारच्या चाचणीत ते साध्य होऊ शकले नाही.