(Image Source X )
आंतरराष्ट्रीय

क्रिप्टोकरन्सी अब्‍जाधिशाचा अंतराळ प्रवास : स्‍पेस एक्‍सची पहिली व्यावसाईक मोहीम

Space X Commercial Mission| मोहिमेत होणार अनेक अंतराळ प्रयोग, नवीन मार्गावरुन फिरणार अंतराळयान

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

स्पेसएक्स कंपनीने सोमवारी आपल्या पहिल्‍या व्यावसायिक मोहीमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. या अंतराळ मोहिमीचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे या यानातून पहिल्‍यांदाच एका अब्‍जाधिशाला सफर करण्यासाठी अंतराळात पाठवण्यात आले आहे. हे यान पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या वरून प्रदक्षिणा घालणार असून अंतराळ मोहिमांमध्ये हा मार्ग पहिल्‍यांदाच वापरला जाणार आहे. या मोहिमेचे नाव फ्रॅम 2 (Fram 2 ) असे असणार आहे. याबाबतचे वृत्त सीएनएनने दिले आहे

हा अब्‍जाधिश करणार अंतराळात प्रवास

फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून रात्री ९.४६ मिनिटांनी फ्रॅम 2 नावाची मोहिमेंतर्गत हे यान प्रक्षेपित करण्यात आले. ३ ते ५ दिवस हे यान अंतराळात राहील. माल्टामध्ये राहणारे चिनी वंशाचे असलेले चुन वांग असे या प्रवास करणाऱ्या अब्‍जाधिशाचे नाव आहे. त्यांनी बिटकॉइन तसेच माइनिंग व्यवसायातून प्रचंड संपत्ती कमावली आहे. या प्रवासासाठी स्पेसएक्सला त्‍यांनी अब्‍जावधीची रक्‍कम दिली आहे, पण स्‍पेसएक्‍सने याबाबत कोणाताही खुलासा केलेला नाही. चुन वांग यांनी या माहिमेचा खर्च उचलला असून त्‍यांच्या बरोबर आणखी तीन सहकारी या यानातून प्रवास करणार आहेत. नॉर्वेजियन चित्रपट दिग्दर्शक जानिके मिकेलसेन, जर्मनीतील रोबोटिक्स संशोधक राबेया रॉग आणि ऑस्ट्रेलियन साहसी एरिक फिलिप्स. हे वांग यांचे सहकारी असणार आहेत. रोबेया रॉग या जर्मनीतील पहिल्‍या महिला ठरणार आहेत ज्‍या अशाप्रकारच्यास मोहिमेसाठी रवाना होणार आहेत.

फाल्‍कन ९ रॉकेटने यान पोहचवले कक्षेत

फ्रॅम २ मोहिमेचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे हे यान प्रतितास २८ हजार किलोमिटर इतक्‍या वेगाने आपल्‍या कक्षेत पोहचले आहे. या यानाला त्‍याच्या कक्षेत पोहचवण्यासाठी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा वापर केला गेला. लाँच झाल्‍यानंतर हे रॉकेट दक्षिणेकडे झेपावले. दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवाकडे असा त्‍याचा प्रवास असणार आहे. हा मार्ग यापूर्वी कोणत्याही मानवासह अंतराळ मोहिमेसाठी वापरण्यात आलेला नव्हता. उड्डाणानंतर काही मिनिटांतच, फाल्कन 9 रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील बूस्टर मुख्य रॉकेटपासून वेगळे झाले आणि ते समुद्रातील लँडिंगसाठी परत गेले. सर्व चार अंतराळयात्री पहिल्यांदाच अवकाश प्रवास करत आहेत.

पहिल्‍यांदाच अंतराळात काढला जाणार एक्‍स - रे

या मोहिमेतंर्गत मानावाच्या शरीरावर अंतरिक्ष प्रवासाचा होणार परिणाम याचा अभ्‍यास केला जाईल तर कमी गुरुत्‍वाकर्षणाचा (Microgravity) काय परिणाम मानवाच्या शरीरावर होतो यावरही संशोधन होईल. तसेच अंतराळात पहिल्‍यांदाच एक्‍स-रे काढला जाईल यातून सुक्ष्म गुरुत्‍वाकर्षणामूळे मानाच्या हाडे व स्‍नायूंवर काय परिणाम होतो याचा अभ्‍यास होईल व्यायामाचा अभ्‍यास या मोहिमेतील एक प्रयोग असणार आहे. या प्रयोगातून अंतराळात जास्‍त वेळ घालवावा लागला तर स्‍नायू व हाडे यांच्यावर काय परिणाम होतो व व्यायामाने त्‍यामध्ये कसा फरक पडतो याचा अभ्‍यास या प्रयोगातून होणार आहे.

अंतराळात उगवणार मशरुम

या मोहिमेंतर्गत एक प्रयोग आहे ज्‍यामध्ये अंतराळातील वातावरणात मशरुम कसे उगवता येतील याची पाहणी केली जाईल. यातून अधिक दिवसांच्या मोहिमेमध्ये अंतराळयात्रींना खाद्यपदार्थ तयार करणे व ते टिकवणे यांची अधिक माहिती मिळेल. तसेच हे अंतराळयात्री जेंव्हा ड्रॅगन यानातून पृथ्‍वीवर परत येतील तेव्हा ते कोणत्‍याही मदतीविना यानातून बाहेर कसे येतील याचा अभ्‍यास केला जाईल. ज्‍याद्‌वारे भविष्‍यातील योजनासाठी याचा फायदा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT