पुढारी ऑनलाईन डेस्क : नैऋत्य जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरला. ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे (Earthquake in Japan) धक्के आज (दि.१३) रात्री ९.१९ वाजता जाणवले. यानंतर जपान हवामान संस्थेने मियाझाकी प्रांतासह शेजारच्या कोची प्रांतात त्सुनामीचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, त्सुनामीच्या लाटा एक मीटरपर्यंत पोहोचू शकतात. भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल कोणतेही वृत्त अद्याप मिळालेले नाही. जपान ज्वालामुखीच्या चाप, रिंग ऑफ फायर आणि पॅसिफिक बेसिनमधील फॉल्ट लाइन्सच्या शेजारी असल्याने वारंवार भूकंप होतात.