दक्षिण कोरियाच्या आग्नेय भागातील जंगलात पेटलेल्‍या वणव्‍यात १,३०० वर्षे जुने बौद्ध मंदिर जळून खाक झाले आहे. 
आंतरराष्ट्रीय

द. कोरियाच्या जंगलात वणवा; २६ मृत्‍युमुखी, १३०० वर्षांपूर्वीचे बौद्ध मंदिर भस्‍मसात

South Korea wildfires : आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्‍न

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दक्षिण कोरियाच्या आग्नेय भागातील जंगलात पेटलेल्‍या वणव्‍यात मोठी हानी झाली आहे. देशातील ही आजवरच्‍या सर्वात मोठ्या आगीच्‍या दुर्घटनांपैकी एक ठरली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे बाराहून अधिक हेलिकॉप्टर, ५,००० कर्मचारी आणि सुमारे ५६० उपकरणे तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत २६ जणांचा मृत्‍यू झाला असून, १३०० वर्षांपूर्वीचे बौद्ध मंदिरही आगीत भस्‍मसात झाले आहे, असे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे.

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलपासून २०० किलोमीटर आग्नेयेस असलेल्या उइसोंग काउंटीमधील जंगलात शुक्रवारी आग लागली. वार्‍याचा वेग आणि कोरड्या हवामानामुळे अवघ्‍या काही तासांमध्‍ये आगीने जंगलाचा बहुतांश भागाला आपल्‍या कवेत घेतला. अँडोंग, चेओंगसोंग, येओंगयांग आणि येओंगदेओक प्रांतात आग पसरली. आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २४ हून अधिक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियाच्‍या गृह सुरक्षा मंत्रालयाने आज (दि.२७) जाहीर केली. बुधवार दुपारपर्यंत अग्निशमन दलाच्या हेलिकॉप्टरने आग विझवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू केला होता. १७,३९८ हेक्टर (सुमारे ४३,००० एकर) पेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली असल्‍याचे अग्‍निशमन विभागाने म्‍हटलं आहे.

१३०० वर्षांपूर्वीचे बौद्ध मंदिर भस्‍मसात

आगीत उईसॉंग काउंटीमधील १,३०० वर्षे जुने बौद्ध मंदिर जळून खाक झाले आहे. ते देशातील ऐतिहासिक स्थळांसह प्राचीन प्रमुख बौद्ध स्मारकांपैकी एक होते. मागील काही वर्षांमधील देशातील ही सर्वात भीषण आगीची दुर्घटनांपैकी एक ठरली आहे. यामुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. आता आमचे प्रयत्‍न आग आटोक़्‍यात आणण्‍यावर आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियाचे पंतप्रधान आणि कार्यवाहक अध्यक्ष हान डक-सू यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. दक्षिण कोरियामध्ये फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये हवामान कोरडे असताना जंगलात वणवा पेटणे सामान्‍य आहे. या वर्षी तब्‍बल २४४ वणवे नोंदले गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा २.४ पट अधिक असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT