South Korea | दक्षिण कोरियामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्राध्यक्ष येओल यांना अटक  file photo
आंतरराष्ट्रीय

South Korea | दक्षिण कोरियामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्राध्यक्ष येओल यांना अटक

‘मार्शल लॉ’ लागू करत देशात आणीबाणी केली होती जाहीर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियामध्ये ‘मार्शल लॉ’ लागू करत आणीबाणी जाहीर करणारे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी येओल यांनी द. कोरियाममध्ये आणीबाणी जाहीर केली होती. यानंतर कायदेमंडळात त्यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव मंजूर झाला होता. पदावर असताना अटक झालेले येओल हे दक्षिण कोरियाचे पहिले अध्यक्ष आहेत.

आशियातील सर्वात उत्साही लोकशाहींपैकी एक असलेल्या दक्षिण कोरियामध्ये अभूतपूर्व राजकीय उलथापालथीचा काळ सुरू आहे. ३ डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मार्शल लॉ जाहीर केल्याने दक्षिण कोरियातील लोकांना धक्का बसला. त्यानंतर काही तासांनी ‘नॅशनल असेंब्ली’ने मार्शल लॉविरोधात मतदान केल्याने येओल यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. दक्षिण कोरियाच्या ‘नॅशनल असेंब्ली’ या सर्वोच्च कायदेमंडळात शनिवारी येओल यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर त्यांचे सर्व अधिकार आणि कर्तव्य स्थगित झाली.

दरम्यान, आज सकाळी राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या निवासस्थानाजवळ ३ हजारहून अधिक पोलिस अधिकारी जमले. यादरम्यान, येओल यांचे समर्थक तसेच त्यांच्या सत्ताधारी पीपल्स पॉवर पार्टीचे सदस्य आणि सुरक्षा दलामध्ये झटापट झाली. पोलिसांनी अनेकांना ताब्यातही घेतले. या हाय-व्होल्टेज ड्रामा दरम्यान अधिकाऱ्यांनी येओल यांना अटक केली. येओल यांच्या अटकेसाठी तपास संस्थानी मिळवलेले वॉरंट हे दक्षिण कोरियाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांविरुद्ध जारी केलेले पहिलेच वॉरंट आहे. 'येओन यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न बेकायदेशीर आहेत आणि ते त्यांचा सार्वजनिकरित्या अपमान करण्यासाठी आहेत,' असा आरोप येओन यांच्या वकिलांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT