900 Snake escaped दक्षिण चिनमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रदेशाला मुसळधार पावसाचा फटका बसला असून प्रचंड तेथिल नदीला प्रचंड पूर आला आहे. या पूराचा फटका एका सापांच्या ब्रिडींग फार्मला बसला असून. सापळे व भिंती पडल्यामुळे तिथून विषारी कोब्रांसह सुमारे ९०० साप बाहेर पडले; या घटनेनंतर प्रशासनाने बचाव पथके तैनात केली आणि स्थानिक रहिवाशांना सावधगिरीचा इशारा दिला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सोशल मिडीयावर या सापांचे पाण्यात पोहतेल व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही वृत्तसंस्थांनी या सापांनी काहीजणांना दंश केल्याचेही वृत्त दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी हेंगझोऊमधील डेंगवेई गावात शिरले, जिथे हे साप प्रजनन केंद्र स्थित होते. यात पुराचे पाणी शिरले व येथून ९०० विषारी साप बाहेर पडले. या सापांना पकडण्यासाठी आणि आसपासच्या वस्त्यांवरील धोका कमी करण्यासाठी आपत्कालीन पथके पाठवण्यात आली आहेत.
स्थानिक अधिकारी वू झी यांनी सांगितले की, साप पकडण्यासाठी मासे पकडण्याची जाळी आणि 'स्टन गन्स' (विद्युत प्रवाहाचा धक्का देणारी साधने) सज्ज असलेल्या १० सदस्यांच्या बचाव पथकाला तैनात करण्यात आले आहे; त्यांनी असाही दावा केला की हे साप बिनविषारी होते. या घटनेच फुटेज मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पसरले आहे, सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून प्रतिक्रीयांचा पाऊस पडत आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये पुराच्या गढूळ पाण्यातून शेकडो डुकरे पोहण्याचा प्रयत्न करताना आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाताना दिसत आहेत. तसेच काही व्हिडिओंमध्ये महापुराच्या पाण्यात मोठे साप किंवा अजगर झाडांवर आश्रय घेताना किंवा पाण्याच्या प्रवाहावर तरंगताना दिसत आहेत.