आंतरराष्ट्रीय

संभोगाची इच्छाच नसलेल्या वर्गाबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क 

१९४२ साली फिलीप वायले यानं असं लिहून ठेवलं आहे की, 'आपण जे काही करतो, जे काही असतो, जे काही स्वप्नं पाहतो, या ज्या काही प्रेरणा असतात त्या प्रेरणांमध्ये लैंगिक इच्छा एक महत्वाची प्रेरणा आहे. स्त्री, पुरूष, तृतीयपंथी, संभोग, शरीरिक आकर्षण, लैंगिक भावना, समलिंगी, भिन्नलिंगी, उभयलिंगी, विषमलिंगी असे अनेक शब्द लैंगिकतेच्या अनुशंगाने आतापर्यंत आपल्या कानावर आले असतील. पण, त्यात आणखी एक प्रकार म्हणजे 'अलैंगिकता' आहे. मात्र, फारसा कुणाला माहीत नसलेला किंवा दुर्लक्षित अन् गैरसमज असलेला हा प्रकार आहे. अशा अलैंगिकतेबद्दल जाणून घेऊ या…

कोणत्याही लिंगाच्या किंवा लिंगभावाच्या व्यक्तीबरोबर लैंगिक भावना नसणे, लैंगिक किंवा रोमॅंटिक आकर्षण नसणे म्हणजे 'अलैंगिकता' अशी ढोबळमानाने व्याख्या जागतिक पातळीवर करण्यात आली आहे. अलैंगिकतेच्या वर्गीकरणात मोडणाऱ्या लंडनमधील मायकेल डे डोरने वयाच्या १५ व्या वर्षी स्वतःचा उल्लेख करण्यासाठी 'अलैंगिक' हा शब्द वापरला. डोरच्या या शब्दामुळे अलैंगिकता या विषयाला वेगळी दिशा मिळाली. 

वाचा ः सेक्स अर्धवट झाल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो का?

डोरने सांगितलेल्या अलैंगिक शब्दापूर्वी समाजात तृतीयपंथींच्या व्यतिरिक्त 'अलैंगिक समाज'देखील असू शकतो, ही जाणीवदेखील नव्हती. यासंदर्भात जीवशास्त्राच्या अनुषंगाने प्राण्यांमध्ये अलैंगिक हा गुणधर्म आढळतो, याचा अभ्यास झालेला होता. पण, त्याविषयी फारसं काही साहित्य, अभ्यास, संशोधन, उपलब्ध नव्हतं. जे काही शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले होतं. त्यात 'डड' हा शब्ध वापरण्यात आला होता. 

अलैंगिक व्यक्तीच्या संख्येवर डोर एक शक्यता व्यक्त करतो की, "समाजात जितक्या व्यक्ती समलिंगी आहेत तितक्याच व्यक्ती अलैंगिक असू शकतात. २००४ साली 'असेक्श्युआलिटी : प्रिव्हेलन्स अँण्ड असोसिएटेड फॅक्टर्स इन अ नॅशनल प्रोबॅबिलिटी सॅम्पल' हा कॅनडातील शिक्षणतज्ज्ञ अँथनी बोगर्ट यांचा शोधनिबंध प्रसिद्ध होईपर्यंत अलैंगिक म्हणजेच लैंगिक आकर्षण अजिबात नसणे ही कल्पनाच समाजात नव्हती. 

वाचा ः विवाहपूर्व हस्तमैथुन केले तर विवाहानंतर सेक्स करण्याची इच्छा कमी होते का?

बोगर्ट यांनी महत्वाचं संशोधन करून हा निबंध प्रसिद्ध केला होता. त्यांनी १९९० साली अलैंगिकतेविषयी १८ हजार लोकांची माहिती गोळा केली. त्यात केवळ १ टक्के लोक अलैंगिक असल्याचा दावा केला होता. त्यातही ७० टक्के महिलांनी लैंगिक आकर्षणाविषयी उत्सुक नसल्याचं सांगितलं होतं. डोरच्या म्हणण्याप्रमाणे या संशोधनामध्येदेखील समलिंगी व्यक्तीच्या संख्येइतकीच अलैंगिक व्यक्तींची संख्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. हे संशोधनामध्ये स्पष्ट झाले असूनही समाज अलैंगिक लोकांना समलिंगी किंवा बाय सेक्श्युअल समजतात. 

अलैंगिक समुदायाविषयी कार्यरत असणारं मुख्य ऑनलाइन केंद्र म्हणजे 'असेक्श्यूल व्हिजबिलिटी अँड एज्युकेशन नेटवर्क (एव्हीएएन) असं सांगतं की, लैंगिक समुदायात जशी भावनात्मक आवश्यकता असते तशीच ती अलैंगिक समुदायात नसते. ती भावना मोठ्या प्रमाणात बदलत असते. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील २१ वर्षांची विद्यार्थी जेनी गुडचिल्ड सांगते की, "युकेमधील सुमारे १ टक्का लोक स्वतः अलैंगिक असल्याचे सांगतात. अलैंगिकतेचे वर्णन एक ब्रह्मचर्येपेक्षा वेगळे आहे."

वाचा ः स्त्री पुरुषांमध्ये 'सेक्स'ची इच्छा जास्त असणे ही समस्या आहे का?

२००२ साली अमेरिकेतल्या नॅशनल रिलीजियस व्होकेशन काॅन्फरन्सच्या वार्षिक अंकातल्या लेखामध्ये अलैंगिकतेविषयी लोकांची मते दिली आहे. संबंधित लेखकाने बऱ्याच लोकांशी संपर्क साधून 'अलैंगिकतेविषयी तुम्हाला काय वाटतं', असा प्रश्न विचारला होता. तर, उत्तर आलं की, अलैंगिक व्यक्तीला व्यक्तीच म्हणू नये. अलैंंगिक व्यक्ती असतच नाही, लैंगिकता तर परमेश्वराची देण आहे, तर अशी व्यक्ती असणंच शक्य नाही. असंच मत लेखकाला बऱ्याच लोकांकडून एेकायला मिळालं. संबंधित लेखकाने काही समलिंगी लोकांना विचारलं असता खुद्द तेदेखील या संकल्पनेपासून अनभिज्ञ आहेत. त्यांच्या मते अलैंगिकता अस्तित्वातच नसते. हे वाक्य लेखकाला चक्रावणारं होतं. 

अलैंगिक व्यक्ती हेटरोरोमॅंटिक म्हणजेज भिन्नलिंगी व्यक्तीच्या प्रेमात पडणारी, होमोरोमॅंटिक म्हणजेच समलिंगी व्यक्तीच्या प्रेमात पडणारी, बायरोमॅंटिक म्हणजेच दोन्ही लिंगांच्या प्रेमात पडणारी, अरोमॅंटिक म्हणजेच लैंगिकतेविषयी इच्छा नसणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडणारी असू शकते. काही अलैंगिक व्यक्ती सेक्सविषयी आकर्षण नसते पण त्या व्यक्तीला गोंजारणे, मिठी मारणे आवडू शकते किंवा काहींना आवडू शकत नाही. अलैंगिक व्यक्तींच्या संदर्भात काम करणाऱ्या 'असेक्श्यूल व्हिजबिलिटी अँड एज्युकेशन नेटवर्कमध्ये २००३ मध्ये ३९१ सदस्य होते. हाच सदस्यांचा आकडा १ लाख ३३ हजार ६६३ पर्यंत पोहोचलेला आहे. अलैंगिक व्यक्तींची संख्या वाढते आहे. 

वाचा ः विविध पोझिशन्समध्ये SEX करणे कितपत सुरक्षीत आहे?

बरेच लोक अलैंगिकत व्यक्तींसंबंधी असं समजतात की, अलैंगिक लोकांची इच्छापूर्ती होत नाही. ते इतर सामान्य लोकांपेक्षा अपूर्ण असतात. पण, डोरच्या मते हा समज पूर्ण चुकीचा आहे. हा समज खोडून काढणे गरजेचे आहे. अलैंगिक लोक परमेश्वराने दिलेल्या लैंगिक इच्छेच्या देणगीला मुकतात, असं सर्वांना वाटतं पण, यापेक्षाही अनेक पर्याय आमच्यासमोर असतात, असं डोर सांगतो. अलैंगिक लोक अरोमॅंटिक असतात त्याबद्दल सांगताना वारविक विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ मार्क कॅरिगन सांगतात की, "अरोमॅंटिक प्रकारातील लोकांना जराही शारीरिक आकर्षण नसते. त्यांना कोणताही स्पर्श नको असतो. त्यांना शारिरीक जवळीकतेचीदेखील आवश्यकता नसते. तर, रोमॅंटिक प्रकारातील लोकांकडे सेक्सविषयक आकर्षणाचा अनुभव नसतो. पण, त्यांनी रोमॅंटिकपणा अनुभवलेला असतो", हा प्रमुख फरक कॅरिगन यांनी सांगितलेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT