Axiom 4 Dragon ISS docking x
आंतरराष्ट्रीय

Axiom 4 Dragon ISS docking | शुभांशु शुक्ला ठरले ISS वर जाणारे पहिले भारतीय; 'ड्रॅगन ग्रेस' यानाचे यशस्वी डॉकिंग, पाहा व्हिडिओ

Axiom 4 Dragon ISS docking | शुभांशु शुक्लांसह सर्व अंतराळवीरांचे ISS वर स्वागत

Akshay Nirmale

Axiom 4 Dragon ISS docking

केनेडी स्पेस सेंटर : Axiom Space आणि SpaceX यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या Axiom-4 (Ax-4) खासगी अंतराळ मोहिमेचे यान ‘ड्रॅगन ग्रेस’ आज भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता केनेडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले.

या मोहिमेत भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे मिशन पायलट म्हणून सहभागी असून त्यांच्यासोबत मिशन कमांडर पेगी व्हिटसन, आणि मिशन स्पेशालिस्ट स्लावॉस उझनान्स्की-व्हिस्न्येव्य्स्की व टिबोर कपु हे देखील आहेत.

दरम्यान, शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. भारताच्या दृष्टीने ही ऐतिहासिक कामगिरी आहे.

या यानाने भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) Harmony मॉड्यूलच्या स्पेस फेसिंग पोर्टवर यशस्वीरित्या डॉकिंग केले. यानाचे पहिला सॉफ्ट कॉन्टॅक्ट भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4.01 वाजता झाला.

मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे

  • Waypoint 0: यान ISS पासून 400 मीटर अंतरावर आले.

  • Waypoint 1: यान 220 मीटर अंतर पार करत आले आणि docking ची तयारी सुरू.

  • Waypoint 2: यान 20 मीटरपर्यंत जवळ आले आणि डॉकिंग अॅक्सेस मिळाले

  • Docking: निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटे लवकर डॉकिंग पूर्ण झाले. अंतराळात एक यान दुसऱ्या यानाला जोडले जाणे म्हणजे डॉकिंग.

ड्रॅगन ग्रेसचे ISS वर स्वागत

ISS वरील Expedition 73 चे सदस्य — NASA चे अ‍ॅस्ट्रोनॉट्स निकोल एयर्स, अ‍ॅनी मॅकलेन, आणि जॉनी किम, JAXA चे ताकुया ओनिशी, तसेच रशियन कॉस्मोनॉट्स किरील पेस्कोव, सर्जी रायझिकोव आणि अलेक्सी जुब्रिट्स्की यांनी Ax-4 च्या क्रूचे स्वागत केले.

डॉकिंगनंतर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन स्वागत सोहळा आणि सुरक्षाविषयक माहिती सत्र घेतले.

शुभांशु शुक्ला – राकेश शर्मा यांचा वारसदार

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेतील अधिकारी असून, अंतराळात गेलेले दुसरे भारतीय IAF अधिकारी बनले आहेत.

याआधी, 1984 साली विंग कमांडर राकेश शर्मा हे सोव्हिएत युनियनच्या Interkosmos कार्यक्रमांतर्गत Soyuz T-11 यानातून Salyut 7 स्पेस स्टेशनवर गेले होते. शुक्ला यांच्यासाठी ही एक ऐतिहासिक संधी असून, त्यांनी भारताचा झेंडा पुन्हा एकदा आंतराळात फडकवला आहे.

थेट प्रक्षेपण व NASA अपडेट्स

NASA, SpaceX आणि Axiom Space यांनी या मोहिमेचे थेट प्रक्षेपण केले. "Dragon seems to be looking up to ISS as the journey continues," असे SpaceX ने docking दरम्यान सांगितले.

ISS वरील वैज्ञानिक कार्ये सुरूच

डॉकिंग प्रक्रियेदरम्यान ISS वरील NASA च्या अ‍ॅस्ट्रोनॉट्स — अ‍ॅनी मॅकलेन आणि निकोल एयर्स — यांनी मिशनचे निरीक्षण केले. इतर सदस्यही नियमित सूक्ष्मगुरुत्वाकर्षण संशोधन आणि प्रयोगशाळा देखभालीच्या कामात व्यस्त होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT