इराणच्या सर्वोच्च न्यायालयाची इमारत Image Source X
आंतरराष्ट्रीय

इराणमधील सर्वोच्च न्यायालयासमोर गोळीबार : दोन न्यायाधिशांची हत्‍या

Iran Firing Supreme Court | हल्‍लेखोराने स्‍वःतावर गोळी झाडून घेतली

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इराणच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर दोन न्यायाधिशांची गोळ्या घालून हत्‍या करण्यात आली आहे. मोहम्‍मद मोघीश व अली राझीनी अशी या न्यायाधिशांची नावे आहेत. इराणच्या न्यायालयाची अधिकृत वेबसाईड मिझानने यासंदर्भात माहिती दिली. त्‍यांच्या म्‍हणन्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीश हल्‍लेखोरांच्या टार्गेटवर होते. यापैकी दोघांना मारण्यास हल्‍लेखोर यशस्‍वी झाले आहेत. तर एक न्यायाधीश जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती डीडब्‍ल्‍यू या वेबसाईटने दिली आहे.

हल्‍लेखोराने न्यायाधिशांवर गोळ्या झाडल्‍यानंतर स्‍वःतावर गोळी झाडून घेतली, यामध्ये हल्‍लेखोर ठार झाला आहे. तीसरे न्यायाधीश व त्‍यांचा अंगरक्षकही या गोळीबारात जखमी झाला आहे. या हल्‍ल्‍याचा उद्देश स्‍पष्‍ट झालेला नाही. इराणमधील विरोधी पक्षाने न्यायाधीश मोघिश हे राजकीय कैद्यांच्या खटल्‍यांमध्ये सहभागी होते. त्‍यामुळेच त्‍यांची हत्‍या झाल्‍याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT