आंतरराष्ट्रीय

Shocking stunt : ३००० हजार फूट उंचीवरील हॉट एअर बलूनवर चालवली सायकल, ऑस्ट्रियाच्या बाईकरचा धाडसी स्टंट!

बाईकसह केले स्कायडायव्हींगही, थरारक विक्रम, जगातला पहिलाच प्रयोग

Namdev Gharal

Shocking stunt ऑस्ट्रेयातील २६ वर्षीय माउंटेन बाइकर एलियास श्वार्झलरने एक थरारक स्टंट केला असून त्‍याची चर्चा आता जगभर होत आहे. त्‍याने एका उडणाऱ्या हॉट एअर बलूनच्या वरच्या भागावरून सायकल (माउंटेन बाइक) चालवण्याचा आणि त्यानंतर बाइकसह स्कायडाइव्ह करण्याचा स्टंट केला आहे. तसेच हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्याने केला आहे.

एलियास श्वार्झलर याने बुल्गेरियातील 'शुमेन' (Shumen) शहराच्या आकाशात हा अंगावर काटा आणणारा स्टंट केला. या स्टंटसाठी एका हॉट एअर बलूनच्या अगदी टोकावर विशेष ट्रॅक तयार करण्यात आला होता. एलियासने ९५० मीटर उंचीवर या बलूनवरून आपली माऊंटन बाईक चालवली. एवढ्यावरच न थांबता, बाईक चालवत त्याने थेट हवेत उडी घेतली.

श्वार्झलरने जमिनीपासून९५० मीटर - ३,२८० फुटांपेक्षा जास्त उंचीवर तरंगणाऱ्या बलूनच्या वरच्या भागावरून बाइक चालवली. त्यानंतर त्याने स्वतःला आणि बाइकला मोकळ्या हवेत झोकून दिले आणि सुरक्षित लँडिंगसाठी पॅराशूटचा वापर केला. हा प्रयोग प्रत्यक्षात आणण्यापूर्वी श्वार्झलरला दोन वर्षांहून अधिक काळ नियोजनासाठी लागले.

जगातील सर्वात वेगवान सायकल चालवण्याचा विक्रम

अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत सायकलिंग करणाऱ्या या बाइकरने आपली विषेश ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या अगोदरच्या कामगिरीमध्ये २०२२ मधील एका 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चा समावेश आहे; यात रेसिंग मोटारसायकलद्वारे ओढले जात असताना त्याने सायकलवर ताशी २७२.९ किमीचा वेग गाठला होता. माऊंटन बाईकिंग, हॉट एअर बलूनिंग आणि बेस जंपिंग या तिन्ही धोकादायक प्रकारांमध्ये केलेला हा स्टंट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT