मनजित संघा या महिलेचे दोन्ही हात- पाय कापावे लागले आहेत  
आंतरराष्ट्रीय

Shocking news | लाडक्या कुत्र्याने जखमेवर चाटले, महिलेने गमावले दोन्ही हात पाय: उपरचारादरम्यान आला होता 6 वेळा अटॅक!

कॅनडा येथील भारतीय वंशाच्या महिलेवर ओढवला भयंकर प्रसंग

Namdev Gharal

Shocking news कॅनडा मधून एक अतिशय धक्कादाय बातमी आली आहे. या घटनेत एका भारतीय वंशाच्या महिलेला स्वताच्या पाळीव कुत्र्यामुळे आपले दोन्ही हात- गमवाले लागले आहेत. या महिलेच्या हातावर किरकोळ जखम झाली होती त्‍यावेळी लाडाने जवळ आलेल्या कुत्र्यांने तिच्या हाताला चाटायला सुरु केले. यावेळी या जखमेमध्ये कुत्र्यांच्या लाळेचा संसर्ग झाला. त्‍यानंतर काही तासातच तिची प्रकृती बिघडली हळू हळू तिच्या शरीरात बदल होत गेले रोग इतका बळावला की तिचे दोन्ही हात - पाय कापावे लागले.

ही गोष्ट आहे कॅनडा येथे राहणाऱ्या मनजित संघा या 56 वर्षीय महिलेची. मनजित संघा यांच्या हाताला एक छोटीशी जखम झाली होती. त्यांच्या पाळीव कुत्र्याने ती जखम चाटली. सुरुवातीला ही गोष्ट अतिशय सामान्य वाटली, त्‍यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले. मात्र अवघ्या काही तासांतच त्यांची प्रकृती बिघडू लागली.

'सेप्सिस' आणि जीवघेणा संसर्ग

जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांना आढळले की त्यांच्या शरीरात 'कॅपनोसाइटोफॅगा कॅनिमोरसस' (Capnocytophaga canimorsus) नावाच्या बॅक्टेरियाचा संसर्ग झाला आहे. हा बॅक्टेरिया सहसा कुत्र्यांच्या आणि मांजरींच्या लाळेत आढळतो. त्‍यांच्या कुत्र्याने ही जखम चाटल्यामुळे हा संसर्ग संघा यांच्या शरिरात वेगाने पसरला. की त्याचे रूपांतर 'सेप्सिस' (Sepsis) मध्ये झाले. शरीरातील महत्त्वाचे अवयव वाचवण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. अखेर शस्त्रक्रिया करून त्यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून टाकावे लागले.

उपचारादरम्यान आला सहावेळा अटॅक

गेल्या वर्षी घरात कुत्र्यासोबत खेळत होत्‍या त्‍यावेळी छोट्या जखमेतून हा संसर्ग झाला. त्‍यांना पहिल्या दिवशी थोडी अस्वस्थता जाणवली. नंतर दुसऱ्या दिवशी त्‍या बेशुद्ध पडल्यावर त्‍यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले त्‍यावेळी डॉक्टरांनी त्‍यांना आयसीयुत भरती करावे लागले. त्‍यावेळी त्‍यांचे ओठ पडले होते त्‍यावेळी डॉक्टरांनी सेप्सीस झाले होते. संसर्ग इतका भयंकर घडला होता की त्‍यांना उपचारदरम्यान आयसीयूत 6 वेळा अटॅक आला होता. त्‍याच्या शरीरातील महत्‍वाचे अवयव वाचवण्यसाठी त्‍यांना मनजित यांचे दोन्ही हात पाय कापावे लागले.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कुत्र्याच्या लाळेतून असा गंभीर संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत दुर्मिळ आहे. मात्र, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्यांच्या शरीरावर उघडी जखम आहे, त्यांना याचा धोका अधिक असतो. त्‍यामुळे कितीही लाडका कुत्रा किंवा मांजर असेल शरीरावर कुठेही कापले असेल किंवा जखम असेल तर पाळीव प्राण्यांना ती चाटू देऊ नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT