Bangaladesh Crisis
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. Twitter
आंतरराष्ट्रीय

शेख हसीनांसाठी वाईट बातमी! अमेरिकेत प्रवेशावर बंदी, व्हिसा रद्द

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bangaladesh Crisis : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन सरकारने त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. परराष्ट्र खात्याच्या जवळच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. शेख हसीना यांनी सोमवारी (दि. 5) दुपारी बांगलादेश सोडले. त्यानंतर त्यांनी पहिला भारतात आश्रय घेतला आहे. हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय अमेरिकेत व्हर्जिनियामध्ये राहतो. त्यामुळे त्या तिथे जातील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण या राजकीय घडामोडीत हसीना यांना अमेरिकेची दारे बंद करण्यात आली आहेत.

अमेरिका काय म्हणाली?

बांगलादेशच्या स्थानिक वृत्तसंस्थेनुसार, ढाका येथील अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्याने या मुद्द्यावर सांगितले की, अमेरिकेच्या कायद्यानुसार व्हिसाचे रेकॉर्ड गोपनीय आहेत. म्हणून आम्ही वैयक्तिक व्हिसा प्रकरणांच्या तपशीलावर चर्चा करत नाही. मात्र शेख हसीना यांच्या पक्षातील अनेक सदस्य आणि अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदी घालण्यात आली आहे.

ब्रिटनलानेही दिला धक्का

बांगला देशमध्‍ये आरक्षणावरून हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी सोमवार (दि.५ ऑगस्ट) पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी देश सोडत भारतात तात्‍पुरता आश्रय घेतला आहे. त्‍या इंग्‍लंडमध्‍ये आश्रय घेण्‍यासाठी प्रयत्‍नशील असल्‍याचे मानले जात होते. मात्र इंग्‍लंडकडून याबाबत अधिकृत टिप्‍पणी आलेली नाही. मात्र इंग्‍लडच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाच्‍या सूत्रांनी याबाबत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

'पीटीआय'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, शेख हसीना या सोमवार, ५ ऑगस्‍ट रोजी भारतात दाखल झाल्‍या आहेत. त्‍यांनी भारतमार्गे लंडनला जाण्याची योजना आखली होती; पण आता त्या दुसऱ्या पर्यायाचा विचार करत आहेत. कारण ब्रिटन सरकारने स्‍पष्‍ट केले आहे की, त्यांना कोणत्याही संभाव्य तपासाविरुद्ध ब्रिटनमध्ये कायदेशीर संरक्षण मिळणार नाही.

शेख हसीना यांनी भारतमार्गे लंडनला जाण्याची योजना आखली होती. हिंडनला पोहोचण्यापूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत भारतीय अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. त्‍या बांगला देश लष्‍कराच्‍या C-130J विमानातून हिंडन एअरबेसवर उतरल्या. आपली बहीण शेख रेहाना हिच्याकडे तात्पुरता आश्रय घेण्यासाठी भारतातून लंडनला जाण्याचा विचार करत होत्‍या. होती. पण आता ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसक निदर्शनांच्या संभाव्य तपासाविरुद्ध शेख हसीना यांना कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, असे संकेत ब्रिटन सरकारने दिले आहेत.

हसीना अज्ञात ठिकाणी

बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांनी शेख हसीना यांनी सोमवारी बांगलादेश सोडला आणि भारताच्या हिंडन एअरबेसवर उतरल्या. मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर हसीना यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आणि कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.

अमेरिकेला जाण्याची योजना होती?

हसीना अमेरिकेला जाण्याची योजना होती की नाही हे स्पष्ट झालेले नाही. पण अहवालात असे उघड झाले आहे की हसीना ब्रिटनमध्ये आश्रयासाठी अर्ज करण्याचा विचार करत होत्या. जिथे त्यांची बहीण (शेख रेहाना) आणि भाची (ट्यूलिप सिद्दिक एमपी) राहतात. तथापि, तेथील नियमांनुसार ब्रिटनच्या बाहेरून आश्रयाचा दावा करणे शक्य नाही आणि युकेची अपेक्षा आहे की एखाद्या व्यक्तीने प्रथम सुरक्षित तिसऱ्या देशात आश्रयाचा दावा केला पाहिजे. ज्यामुळे हसीना पहिला भारत आल्या आहेत.

शेख हसीना आता अन्‍य पर्यायांच्‍या शोधात

शेख हसीना यांनी आता इंग्‍लंड ऐवजी अन्‍य देशात आश्रय घेण्‍याचा पर्यायांचा विचार करत आहेत. शेख हसीना यांच्या कुटुंबातील सदस्यही फिनलँडमध्ये असल्याचेही समोर आले आहे, त्यामुळेच त्यांनी उत्तर युरोपीय देशात जाण्याचा विचारही केला असल्‍याचेही मानले जात आहे.

SCROLL FOR NEXT