Sheikh Hasina Bangladesh Return News  File Photo
आंतरराष्ट्रीय

Sheikh Hasina : 'मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही', बांगलादेशच्या वकिलांनी सांगितले शेख हसीनांच्या 'घरवापसी'नंतरचे भयानक परिणाम

बांगलादेश उच्चायुक्तालयाने फेटाळली नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र जारी करण्याची विनंती

पुढारी वृत्तसेवा

Sheikh Hasina Bangladesh Return News : "माजी पंतप्रधान शेख हसीना मायदेशी परतल्या, तर त्यांच्यासमोर फाशीच्या शिक्षेला सामोरे जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही," असे धक्‍कादायक दावा बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचे (ICT) मुख्य वकील मोहम्मद अमीनुल इस्लाम यांनी केला आहे. दरम्‍यान, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबर महिन्यात मायदेशी परतण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र जारी करण्याची विनंती केली होती. मात्र ढाका प्रशासनाने ती फेटाळून लावली आहे आहे. नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाने स्पष्ट केले की, फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्‍या व्‍यक्‍तीला प्रवास कागदपत्रे जारी करण्याची कायदेशीर तरतूद नाही.

शेख हसीना यांच्‍याकडे दुसरा पर्याय नाही

'एएफपी' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अमीनुल इस्लाम म्हणाले, "शेख हसीना यांच्याकडे न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी स्वीकारण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या तीव्र जनक्षोभ आणि हिंसक आंदोलनानंतर हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर केलेल्या कथित कारवाईप्रकरणी ट्रिब्यूनलने त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

हसीना यांच्यावर १५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल

"मला तुरुगात पाठवले जाऊ शकते किंवा माझा जीव घेतला जाऊ शकतो, परंतु भीती ही जनतेप्रती असलेल्या माझ्या कर्तव्याची दिशा ठरवू शकत नाही," असा विश्‍वास नुकताच शेख हसीना यांनी व्‍यक्‍त केला होता.हसीना यांनी सोमवारी लंडनस्थित वकिलांच्या माध्यमातून नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाकडे नवीन पासपोर्ट आणि ओळखपत्रासाठी अर्ज केला होता. बांगलादेश सरकारने शेख हसीना यांना दहशतवादी घोषित केले असून त्यांच्यावर १५० हून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ढाकाकडून हसीना यांच्या प्रत्यार्पणाची वारंवार मागणी

हसीना यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयात आत्मसमर्पण करण्यासाठी त्यांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे. मात्र, अर्ज सादर झाल्यानंतर काही तासांतच ढाकाने तो फेटाळून लावला आहे. त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी पुन्हा लावून धरली. हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यापासून नवी दिल्ली आणि ढाका यांच्यातील संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेश सातत्याने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे, तर भारत या विनंत्यांचा आढावा घेत असल्याचे सांगत आहे.

३० दिवसांत अपील का केले नाही?

फेब्रुवारी २०२६ च्या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेले बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी दोन्ही देशांमधील राजनैतिक प्रयत्नांनंतरही नवी दिल्लीत झालेल्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेसारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणे टाळले. त्यांना मायदेशात परत यायचे असते, तर त्यांनी अपील करण्यासाठीच पुनरागमन केले असते," अस सांगत मुख्य वकील अमीनुल इस्लाम यांनी हसीना यांच्या परतण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. निकाल लागल्यानंतर त्यांनी निश्चित केलेल्या मुदतीत परत येऊन अपील करायला हवे होते. जर त्यांना खरोखरच बांगलादेशात यायचे असते, तर त्यांनी खटल्यादरम्यानच परत येऊन कायदेशीर कारवाईचा सामना केला असता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT