Shashi Tharoor son job loss pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Shashi Tharoor son job loss: थरूरांच्या मुलाची नोकरी गेली.... वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठी कर्मचारी कपात

इशान थरूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली नोकरी गेल्याचे सांगितलं.

Anirudha Sankpal

Ishan Tharoor Washington Post layoff: जगातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. या वर्तमान पत्राने आपल्या एकूण स्टाफच्या जवळपास एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. ही संख्या जवळपास ३०० पेक्षा जास्त आहे. या कर्मचारी कपातीत काँग्रेसचे खासदार शशी थरून यांचा मुलगा देखील आला आहे. इशान थरूर हे या वर्तमानपत्रात वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तंभलेखक म्हणून काम करत होते.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

इशान थरूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली नोकरी गेल्याचे सांगितलं. त्यांनी हा दिवस न्यूजरूम आणि जागतिक पत्रकारितेसाठी एक वाईट दिवस असं म्हणत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

इशान एक्सवर लिहितात की, 'आज आंतरराष्ट्रीय स्टाफच्या अनेक साथीदारांसोबत आणि इतर काही चांगल्या कर्मचाऱ्यांसोबत मला देखील वॉशिंग्ट पोस्टने काढून टाकलं आहे. आज संपूर्ण न्यूजरूम आणि दर्जेदार पत्रकार ज्यांनी वॉशिंग्टन पोस्टची आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा केली त्यांचे मन चांगलेच दुखावले गेले आहे.' याचबरोबर त्यांनी न्यूजरूमचा एक फोटो शेअर करत त्याला एक वाईट दिवस असं कॅप्शन दिलं.

इशान थरूर यांनी कोणाचे मानले आभार?

इशान थरूर यांनी वॉशिंग्ट पोस्टमधील आपल्या कामाबाबत बोलताना २०१७ मध्ये वर्ल्ड स्तंभ लेखाची सुरूवात करणे ही एक गौरवाची गोष्ट होती. याद्वारे वाचकांना जागतिक विषय चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यास मदत केली जात होती. इशान थरूर यांनी इतके वर्ष त्यांचे रिपोर्टिंग वाचले आणि त्याची प्रशंसा केली त्याबद्दल जवळपास पाच लाख सब्सक्राईबर्सचे देखील आभार मानले.

दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टने आपण मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी कंपनी मोठ्या प्रमाणावर रिस्ट्रक्चर करत आहे त्याचाच हा भाग असल्याचं सांगितलं. वॉशिंग्टन पोस्टने स्पोर्ट्स विभाग पूर्णपणे बंद केला आहे. तर वर्ल्ड ब्युरो आणि पुस्तक विभाग देखील बंद केला आहे.

विशेष आश्चर्याची बाब म्हणजे मध्य पूर्वची पूर्ण रिपोर्टिंग टीम आणि संपादकांना देखील हटवण्यात आलं आहे.

माजी संपाकदांची टीका

वॉशिंग्ट पोस्टचे माजी कार्यकारी संपादक मॉर्टिन बॅरन यांनी कंपनीचा हे पाऊल म्हणजे स्वतःचा ब्रँड स्वतःच संपवणे... अशी प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तपत्र प्रशासनानं सांगितलं की बदलत्या तंत्रज्ञान आणि वाचक, प्रेक्षकांची बदलेली सवय याद्वारे स्वतःला तयार करण्यासाठी हा कठोर आणि वेदनादायी निर्णय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT