Shahzad Bhatti | दाऊदनंतर आता भारतासाठी शहजाद भट्टीची डोकेदुखी 
आंतरराष्ट्रीय

Shahzad Bhatti | दाऊदनंतर आता भारतासाठी शहजाद भट्टीची डोकेदुखी

ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांना हेरून त्यांचा कारवायांसाठी वापर

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानात बसून भारताविरोधात कारवाया करणाऱ्या दाऊद इब्राहिमनंतर आता शहजाद भट्टी हा दहशतवादी भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांचा भारताविरोधातील कारवायांसाठी वापर करण्यासोबतच लहान-मोठे हल्ले घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करण्यासह प्रत्यक्ष हल्ले घडविण्यापर्यंत सहा टप्प्यावर त्याचे नेटवर्क काम करत असल्याचे उघड झाले आहे.

१६ मार्च २०२५च्या पहाटे पंजाबच्या जालंधरमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व यूट्यूबर नवदीप सिंह संधू यांच्या घरावार हल्ला झाला. बाल्कनीत ग्रेनेड फेकला गेला. पंजाब पोलिस व एनआयएने या प्रकरणात हार्दिक कंबोज नावाच्या स्थानिक तरुणाला अटक केली. या हल्ल्याची जबाबदारी पाकमध्‍ये दडलेला गँगस्टर ते दहशतवादी बनलेल्‍या शहजादने स्वीकारली आणि हे प्रकरण हाय प्रोफाईल झाले. पाकिस्तानात बसून शहजादने भारतात अनेक कट रचले आहेत. पाकमध्‍ये बसून शहजाद व त्याचे गुंड यांचे नेटवर्क आजही काम करत असल्याचे काही रिपोर्ट आहेत.

भट्टीचे नेटवर्क कसे काम करते?

* ड्रग्जच्या आहारी गेलेले, कमी शिकलेले, गरीब व पैशांची अत्यंत गरज असलेले भारतीय तरुण हेरणे.

* त्यांना रेकी करणे किंवा सिमकार्ड अरेंज करण्यासारखी कामे देऊन ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला

* २ ते ५ हजार रुपये देऊन त्याच्या नावे सिमकार्ड घ्यायला लावणे.

* सीसीटीव्ही कॅमेरे विकत घेऊन ते सांगितलेल्या ठिकाणी लावणे.

* सीसीटीव्हीला सिमकार्ड कनेक्ट करून पाकिस्तानी हँडलरला त्याचा ॲक्सेस देणे.

* प्रत्यक्षात हल्ले घडविण्यासाठी तरुणांना तयार करणे.

शनी टायगर

पाकिस्तानी गँगस्टर, शस्त्र पुरवठादार, ब्रेन वॉश करण्यात पटाईत

जफर सुपारी

बलुचिस्तानील गँगस्टर, सोशल मीडिया माध्यमातून भारतीय तरुणांच्‍या भरतीची जबाबदारी

फारुख खोखर

बलुचिस्तानी कुख्यात गँगस्टर, शस्त्रांचा मोठा पुरवठादार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT