Cows Admission in school  
आंतरराष्ट्रीय

Cows Admission in school | शाळेने दिले चक्क पाच गायींनाच ॲडमिशन! पटसंख्या कमी असल्याने वर्ग बंद होऊ नये यासाठी अजब शक्कल! (पहा व्हिडीओ)

घटना फ्रान्स देशातील, शाळेचा वर्ग वाचवण्यासाठी शहरातील पालकांसह महापौरांनी घेतला निर्णय, घटनेची होतेय जगभर चर्चा

Namdev Gharal

Cows Admission in school पटसंख्येअभावी वर्ग बंद ही आपल्याकडची नेहमीची गोष्ट, पटसंख्येअभवी शिक्षक अतिरिक्त ठरतात व त्‍यामुळे त्‍यांच्या समायोजनाचा प्रश्न तयार होतो. आपल्याकडे जि.प शाळेत या गोष्टी नेहमीच होत असतात. तसेच दरवर्षी शासननियमानुसार मूले गोळा करताना शिक्षकांची दमछाक होत असते. आता हीच परिस्थिती फ्रान्स सारख्या विकसीत देशात होत असल्याचे दिसून आली आहे. अशाच एका घटनमुळे फ्रान्सच्या एका शाळेची जगभर चर्चा होत आहे

मुलांची संख्या कमीः काढला भन्नाट तोडगा

ही घटना घडली फ्रान्सच्या मूश (Moosch) नावाच्या गावात. याठिकाणी एक सरकारी शाळा आहे. त्‍याठिकाणी स्थानिक मुले शिक्षण घेताता पण सरकारी नियमाप्रमाणे एका वर्गात मुलांची ठराविक पटसंख्या असने आवश्यक आहे. पण या शाळेतील एका वर्गात चार मुले कमी पडत होती. त्‍यामुळे वर्ग बंद करण्याचे आदेश सरकारने काढले पण या वर्गाचे अस्तित्व टिकवण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसाना होऊ नये यासाठी येथे चक्क पाच गायींचे ॲडमिशन करण्यात आले आहे. आता या घटनेची जगभरात चर्चा होत आहे.

फ्रान्समधील अल्सास प्रांतातील मूश (Moosch) या गावात एक प्राथमिक शाळा आहे. फ्रान्सच्या शिक्षण विभागाच्या नियमानुसार, जर विद्यार्थ्यांची संख्या एका ठराविक आकड्यापेक्षा कमी झाली, तर तो वर्ग बंद केला जातो. या शाळेतील एका वर्गाला टाळे लागण्याची भीती निर्माण झाली होती, कारण तिथे आवश्यकतेपेक्षा ४ मुले कमी होती.

वर्गाचे अस्तित्व वाचवण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिक महापौर आणि पालकांनी एक अजब शक्कल लढवली. त्यांनी चक्क पाच स्थानिक गायींना शाळेचे 'विद्यार्थी' म्हणून नोंदवले. या गायींची नावे (उदा. रोझी, मारगुराइट इत्‍यादी ठेवण्यात आली) अधिकृत नोंदणी फॉर्मवर या गायींची नावे लिहून तो अर्ज शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला.

गायींना शाळेच्या आवरातच केली जागा

या गावातील शेवटच्या वर्गात केवळ 6 मुलांनी ॲडमिशन घेतली होती. याची नोंद घेत फ्रान्स सरकारच्या नियमानूसार मुलांची संख्या कमी दिसत असल्याने हा वर्ग बंद करण्याचा प्रस्ताव पाठवला याला विरोध म्हणून व शाळा वाचवण्यासाठी पालक व या गावातील महापौरांनी एका शेतकऱ्याचा 5 गायींनच ॲडमिशन दिले. यामुळे पटसंख्याही पूर्ण झाली. तसेच या गायींसाठी शाळेच्या आवारात एक तात्‍पूरता निवार तयार केला आहे.

सरकारचा निषेध म्हणून.....

हा उपक्रम केवळ गंमत म्हणून केलेला नव्हता, तर तो एक प्रकारचा 'निषेध' होता. पालकांचे म्हणणे आहे की, "सरकार मुलांकडे केवळ 'आकडे' (Numbers) म्हणून पाहते. जर सरकारला फक्त आकड्यांशीच देणे-घेणे असेल, तर मग आम्ही गायींची संख्या मोजून आमचा आकडा पूर्ण करू." ग्रामीण भागातील शाळा बंद होऊ नयेत, हा यामागचा खरा हेतू आहे. पण या अनोख्या घटनेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT