Saudi Arabia Jeddah Tower | सौदी अरेबियात बांधली जातेय एक कि.मी.पेक्षा उंच इमारत! 
आंतरराष्ट्रीय

Saudi Arabia Jeddah Tower | सौदी अरेबियात बांधली जातेय एक कि.मी.पेक्षा उंच इमारत!

बुर्ज खलिफापेक्षा १७२ मीटर जास्‍त असणार उंची

पुढारी वृत्तसेवा

रियाध; वृत्तसंस्‍था : दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीची जगातील सर्वांत उंच इमारत ही ओळख आता मागे पडणार आहे. कारण आता जगातील सर्वात उंच इमारत सौदी अरेबियात उभी राहात असून जेद्दाह टॉवर नावाच्‍या या इमारतीची उंची तब्‍बल एक किलोमीटरपेक्षाही जास्‍त असेल. विशेष म्‍हणजे मुंबईच्‍या ‘लोखंडवाला मिनर्व्हा’ (३०१ मीटर) या भारतातील सर्वात उंच इमारतीपेक्षा जेद्दाह टॉवर तब्‍बल तिपटीपेक्षा जास्‍त उंच राहणार आहे.

सध्या जगातील सर्वात उंच इमारत असलेली दुबईतील ८२८ मीटर उंच बुर्ज खलिफा ही आहे. मात्र जेद्दाह टॉवरची बांधणी पूर्ण झाल्‍यावर बुर्ज खलिफा तिच्‍यासमोर लहान दिसेल. काही वर्षे थांबलेले जेद्दाह टॉवरचे बांधकाम जानेवारी २०२५ मध्ये पुन्हा सुरू झाले आहे. 'एडी मिडल ईस्ट'च्या अहवालानुसार ऑगस्ट २०२६ पर्यंत या इमारतीच्‍या १०७ मजल्‍यांचे काम पूर्ण झाली असून सध्‍या तिची उंची ४३० मीटरपेक्षा जास्त झाली आहे.

जेद्दाह टॉवरची वैशिष्‍ट्ये

क्षेत्रफळ : ५३ लाख चौरस मीटर.

उंची : एक हजार मीटरपेक्षा जास्‍त (सुमारे ३,२८१ फूट).

विशेष : उंची बुर्ज खलिफापेक्षा १७२ मीटर (५६४ फूट) तर मुंबईच्‍या ‘लोखंडवाला मिनर्व्हापेक्षा तिपटीहून अधिक आणि ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा जवळपास ११ पटीने जास्त.

खर्च : ७.२ अब्‍ज सौदी रियाल (१.९ अब्‍ज डॉलर्स).

कधी पूर्ण होणार : ऑगस्‍ट २०२८.

प्रगती : आठवड्याला एका मजल्‍याची उभारणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT