हिजबुल्लाहच्‍या फतव्‍यातूनच रश्‍दी यांच्‍यावर हल्‍ला झाल्‍याचे हल्‍लेखोर हादी मतार याच्‍याविरोधात न्‍यायालयात दाखल केलेल्‍या आरोपपत्रात नमूद करण्‍यात आले आहे. File Photo
आंतरराष्ट्रीय

सलमान रश्दींवरील हल्‍ला 'हिजबुल्लाह'च्‍या फतव्‍यातूनच!

हल्‍लेखोर हादी मतार याच्‍यावरील आरोप निश्‍चित

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी ( Salman Rushdie) यांना ठार मारावे, असा फतवा दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने जारी केला होता. या फतव्‍यातूनच न्‍यू जर्सी येथे रश्‍दी यांच्‍यावर हल्‍ला झाला होता, असे २६ वर्षीय हल्‍लेखोर हादी मतार याच्‍याविरोधात न्‍यायालयात दाखल केलेल्‍या आरोपपत्रात नमूद करण्‍यात आले आहे.

रश्‍दींनी गमावला लागला डोळा

१९८८ मध्‍ये सलमान रश्‍दी यांची 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या कादंबरी प्रकाशित झाली होती. या कांदबरीवर झालेल्‍या वादानंतर १९८९ मध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी मुस्लिमांना रश्दींना ठार मारण्याचा आदेश देणारा फतवा जारी केला होता. याच फतवाच्‍या अमल करण्‍यासाठी हल्‍लेखोर हादी मतार याने २०२२ मध्‍ये रश्‍दी यांच्‍यावर चाकू हल्‍ला केला होता. यामध्‍ये ते थोडक्‍यात बचावले होते. मात्र त्‍यांना एक डोळा गमवावा लागला होता. विशेष म्‍हणजे जेव्‍हा रश्‍दी यांना ठार मारण्‍याचा फतवा जारी करण्‍यात आला होता त्‍यावेळी लेबनीन वंशाच्‍या २६ वर्षीय हादी मतार याचा जन्‍मही झालानव्‍हता. ऑगस्ट २०२२ न्यूयॉर्कमध्ये त्‍याने रश्‍दींवर चाकू हल्‍ला केला होता.

'द सॅटॅनिक व्हर्सेस' पुस्तकावरून वाद

'द सॅटॅनिक व्हर्सेस' या कादंबरीच्‍या प्रकाशनानंतर सलमान रश्दी वादाच्‍या भोवर्‍यात सापडले. इराणकडून त्‍यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्‍यात आली. इराणमध्ये १९८८ मध्‍येच या कादंबरीवर बंदी घालण्यात आली होती. १९८९ मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी जगभरातील मुस्लिमांना रश्दींना ठार मारण्याचे आवाहन करणारा फतवा काढला होता. हिजबल्लाहच्या ही दहशतवादी संघटना लेबनॉनचा इराण समर्थित आहे. हिजबुल्लाहने या फतव्याचे समर्थन केले होते, असे एफबीआयने आपल्‍या निवेदनात म्हटले आहे. रश्‍दी यांच्‍यावर झालेल्‍या हल्‍ल्‍याचा तपास अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) करत आहे. न्याय विभागाच्या माहितीनुसार, दोषी ठरल्यास, हादी मतार याला जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

फतव्याच्‍या प्रभावातूनच रश्‍दींवर हल्‍ला

ॲटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 2022 मध्ये न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दीच्या हत्येचा प्रयत्न करताना हादी मतार याने दहशतवादी संघटना हिजबल्लाहचा फतव्‍याची अंमलबजावणी करण्‍यासाठी दहशतवादी कृत्य केले. तर एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी म्‍हटलं आहे की, 'आरोपी सलमान रश्दी यांना ठार मारण्‍याच्‍या हिजबुल्लाहच्‍या फतव्याचे पालन करत होता. दहशतवादी कृत्ये आणि दहशतवाद्यांना सहाय्य केल्याचा आरोपही त्‍याच्‍यावर ठेवण्‍यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT