Russia Warns Bangladesh: बांगलादेशात सध्या परिस्थिती खूपच अस्थिर झाली आहे. राजधानी ढाकामध्ये रोज आंदोलने अन् हिंसाचार होत आहेत. विद्यार्थी नेता हादीच्या हत्येनंतर तिथल्या भारत विरोधी अन् कट्टर इस्लामिक आंदोलनकर्त्यांनी हिंसक आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. ते भारताला टार्गेट करत असून देशातील अल्पसंख्याक हिंदूंचा देखील छळ करत आहेत.
भारतानं बांगलादेशमधील परिस्थिती पाहून इंडियन व्हिसा अॅप्लिकेशन सेंटर बंद केलं आहे. बांगलादेशने देखील त्यांचे उच्चायुक्तालय अन् व्हिसा सेवा सस्पेंड केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सध्याच्या घडीला चांगलेच ताणले आहेत.
दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव वाढत असलेला पाहून रशियानं देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. रशियाने बांगलादेशला जेवढ्या लवकर भारताशी संबंध सुधारता येईल तेवढं चांगले आहे असं सांगितलं. बांगलादेशमधील रशियाचे राजदूत अलेक्झांडर जी खोजीन यांनी सोमवारी भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील तणाव वाढू देऊ नये आणि यातून लवकरात लवकर तोडगा काढाला जावा अशी आग्रही मागणी केली आहे.
ढाकामधील रशियाच्या दुतावासात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खोजिन म्हणाले की, 'बांगलादेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांपूर्वी देशातील वातावरण अनुकूल होणं गरजेचं आहे. त्यामुळे बांगलादेशने भारतासोबतचा वाढलेला तणाव कमी करावा. हे जेवढ्या लवकर होईल तितकं चांगलं आहे.'
खोजिन यांनी रशिया बांगलादेश आणि भारत यांच्यातील द्वीपक्षीय संबंधामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही असं देखील स्पष्ट केलं. मात्र खोजिन यांनी यापेक्षा जास्त तणाव वाढू देऊ नये. खोजिन यांनी द्विपक्षीय संबंध हे एकमेकांवरच्या विश्वासावर आधारित असतात.