Russia-Ukraine War - Putin and Zelensky  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; 278 ड्रोन युक्रेनमध्ये घुसली!

Russia-Ukraine War: झेलेन्स्कींचा प्रस्ताव नाकारला; पुतिन थेट चर्चेस नकार; युद्धबंदीसाठी ट्रम्प मैदानात

Akshay Nirmale

Russia-Ukraine War

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्ध 2022 पासून सुरू आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला चढवला आहे. रविवारी सकाळी हा हल्ला रशियाने ड्रोन्सच्या सहाय्याने केला. हा आत्तापर्यंतचासर्वात तीव्र हल्ला आहे. यात सुमारे 273 रशियन ड्रोन्स युक्रेनमध्ये घुसली.

दरम्यान, इस्तंबूलमध्ये झालेल्या रशिया-युक्रेन थेट चर्चेच्या अपयशानंतर रशियाकडून हा हल्ला करण्यात आला. या चर्चेत दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घडवून आणण्यात अपयश आले.

रशियाचा जोरदार ड्रोन हल्ला

युक्रेनच्या हवाई दलानुसार, रशियाने एकूण 273 स्फोटक ड्रोन आणि डमी ड्रोन प्रक्षेपित केले. यातील 88 ड्रोन पाडण्यात युक्रेनला यश आले, तर 128 ड्रोन इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळे निष्क्रिय झाले, अशी माहिती देण्यात आली. हे हल्ले विशेषतः कीव्ह, द्निप्रोपेत्रोव्हस्क आणि दोनेत्स्क प्रदेशांवर झाले.

युक्रेनच्या हवाई दलाच्या कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख युरी इह्नाट यांनी Associated Press ला सांगितले की, "हा हल्ला पूर्णपणे युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे."

रशियाचा याआधीचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला युद्धाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला झाला होता, तेव्हा 267 ड्रोन युक्रेनवर डागण्यात आले होते.

कीव्ह प्रांताचे राज्यपाल मायकोला कालाश्निक यांनी सांगितले की, ड्रोन हल्ल्यात 28 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर 4 वर्षीय मुलासह तीन जण जखमी झाले.

झेलेन्स्की यांच्याशी थेट भेटीचा प्रस्ताव पुतिन यांनी फेटाळला

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत तुर्कस्तानमध्ये थेट भेट घेण्याचा प्रस्ताव फेटाळला. युक्रेन आणि अमेरिका यांच्यासह इतर पाश्चिमात्य देशांनी 30 दिवसांच्या युद्धविरामाची मागणी केली होती. पुतिन यांनी अध्यक्ष पातळीवरील नव्हे, तर इतर थेट चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती.

युद्धकैद्यांची देवाणघेवाण होणार

शुक्रवारी इस्तंबूलमध्ये झालेली ही चर्चा दोन तासांपेक्षाही कमी वेळात संपली. युद्धविरामावर कोणतीही ठोस सहमती झाली नाही, मात्र दोन्ही देशांनी प्रत्येकी 1000 युद्धकैद्यांची देवाणघेवाण करण्यावर सहमती दर्शवली. युक्रेनचे गुप्तचर प्रमुख क्यरिलो बुडानोव्ह यांनी शनिवारी युक्रेनच्या दूरदर्शनवर सांगितले की, ही देवाणघेवाण पुढील आठवड्यात होऊ शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की, ते सोमवार पुतिन यांच्याशी फोनवर बोलणार आहेत. त्यानंतर झेलेन्स्की आणि नाटोतील विविध देशांच्या नेत्यांशीही युद्ध संपवण्याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युक्रेनचे ड्रोन पाडल्याचा रशियाचा दावा

दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्याच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी शनिवारी रात्री युक्रेनचे 7 ड्रोन पाडले, आणि रविवारी सकाळी आणखी 18 ड्रोन निष्क्रिय केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT