Russia Diesel supply | अमेरिकेसह जागतिक बाजारात रशिया करणार डिझेल पुरवठा! इंधन कोंडी दूर होणार 
आंतरराष्ट्रीय

Russia Diesel supply | अमेरिकेसह जागतिक बाजारात रशिया करणार डिझेल पुरवठा! इंधन कोंडी दूर होणार

डोनाल्ड ट्रम्प यांचा व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत ऐतिहासिक करार

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : जागतिकस्तरावर निर्माण झालेली इंधन कोंडी फोडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मोठ्या इंधन कराराची अधिकृत घोषणा केली आहे. या करारानुसार, अमेरिका आणि जागतिक बाजारपेठांमधील इंधनाची टंचाई दूर करण्यासाठी रशिया तातडीने लाखो टन डिझेलचा पुरवठा करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर वाढणाऱ्या महागाईशी लढणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या कराराचा भारतालाही मोठा फायदा संभवतो. कारण, रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा ट्रम्प यांनी मांडून भारताला सातत्याने लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुतीन यांच्याशी सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली. त्यानुसार अमेरिका तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी रशिया तातडीने तीन लाख टनांपेक्षा जास्त डिझेल इंधनाची खेप रवाना करेल. इतकेच नव्हे, तर येत्या काही महिन्यांत रशियन रिफायनरीजच्या क्षमतेनुसार हा पुरवठा उत्तरोत्तर ४८ लाख टनांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

ट्रम्प यांचा यू टर्न

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतासह विविध देशांना गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प हे १०० टक्के आयात शुल्क लागू करण्याची धमकी वारंवार देत आले आहेत. तथापि, आता त्यांनीच रशियाकडून तेल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. त्यांचा हा यू टर्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांना बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT