Mojtaba Khamenei | इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी कोमात?  
आंतरराष्ट्रीय

Mojtaba Khamenei | इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी कोमात?

हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

तेहरान; वृत्तसंस्था : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर सत्तेवर आलेले त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी (वय 56) हे एका भीषण हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून, ते कोमात असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. ‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यात मोज्तबा यांनी आपला एक पाय गमावला असून, त्यांच्या यकृत आणि पोटाला गंभीर ईजा झाली आहे.

28 फेब्रुवारी रोजी अमेरिकन आणि इस्रायली फौजांनी केलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या करण्यात आली होती. याच काळात झालेल्या बॉम्बफेकीत मोज्तबा खामेनीदेखील जखमी झाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. तेहरानमधील ऐतिहासिक भागातील सिना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते.

विरोधी दावे

दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे पुत्र युसेफ पेझेश्कियान यांनी मोजताबा खामेनी पूर्णपणे सुरक्षित आणि सुद़ृढ असल्याचा दावा केला आहे. त्यांनी टेलिग्रामवर पोस्ट करत म्हटले की, ‘मी या अफवांची शहानिशा केली असून मोजताबा यांना कोणतीही इजा झालेली नाही.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT