Record snowfall in Russia 
आंतरराष्ट्रीय

Record snowfall in Russia | वाहने - इमारती बर्फाखाली गायब! रशियामधील कामचत्स्की शहरामध्ये ICE AGE ची सारखी हिमवृष्टी!

रशियात निसर्गाचे रौद्ररूप, ६० वर्षांतील सर्वात भीषण हिमवृष्टी

Namdev Gharal

snowfall in Russia यंदा रशियामध्ये अतिप्रमाणात बर्फबारी सुरु असून, गेल्या आठवड्यात हिमवादळ आल्याने प्रचंड प्रमाणात हिमवर्षाव झाला. रशियाच्या उत्तर- पुर्वेकडील टोकावर अनेक शहरांमध्ये इमारती व गाड्या बर्फाच्या डोंगरात गायब झाल्याचे दिसत आहेत. रस्त्‍यावंर लावलेल्या अनेक वाहनांवर 5 ते 10 फुटांचा बर्फाचा थर जमा झाल्याचे दिसत आहे.

अनेक लोक आपल्या छतावरुन थेट बर्फात उड्या घेत आहेत त्‍यांना कोणत्‍याही प्रकारची इजा होत नाही. कारण बर्फाची चादरच एवढी मोठी पडली आहे. तर काही नागरिक म्हणतात की आईज एज सारखी परिस्थती रशियातील उत्तर भागात पसरली आहे. बर्फ एवढा पडत आहे की घराबाहेर पडता येत नाही.

तर रशियाच्या कामचत्स्की द्वीपकल्पावर (Kamchatka Peninsula) गेल्या ६० वर्षांतील सर्वात भीषण हिमवृष्टी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शहरात कित्येक मीटर उंच बर्फाचे ढिगारे साचले असून, अनेक इमारतींचे दरवाजे बंद झाले आहेत इतका बर्फ दरवाज्यांमध्ये साठला आहे.

Record snowfall in Russia

हिमवृष्टीची आकडेवारी

हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात ३.७ मीटर बर्फ पडल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांतच आणखी २ मीटर (साधारण ६.५ फूट) बर्फाची नोंद झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे रस्ते आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रॉयटर वृत्तसंस्थेन असे आपल्या बातमीत म्हटले आहे.

जनजीवन विस्कळीत वाहने बर्फाखाली गायब

हिमवृष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आहे की अनेक चारचाकी गाड्या पूर्णपणे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत रस्त्यांच्या कडेला साचलेले बर्फाचे ढिगारे इतके उंच आहेत की लोक थेट ट्रॅफिक सिग्नलच्या उंचीवरून चालताना दिसत आहेत. अनेक इमारतींच्या प्रवेशद्वारांसमोर बर्फ साचल्याने लोकांना घराबाहेर पडण्यासाठी स्वतः बर्फ खोदून मार्ग काढावा लागत आहे.

माझा गाडी महिना झाली बर्फाखाली

पेट्रोपाव्हलोव्स्क-कामचत्स्की येथील छायाचित्रकार ल्युडमिला मोस्कविचेवा यांनी या हिमवृष्टीबद्दल बोलताना सांगितले की मला शहरात जायचे होते , पण दुर्दैवाने माझी गाडी गेल्या एका महिन्यापासून बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली आहे. अशी प्रतिक्रयी दिली आहे.

थेट खिडकीतून बर्फात उड्या

रशियातील काही माध्यमांनी सांगितले आहेकी अनेक ठिकाणी जनजिवन विस्कळीत झाले आहे. पण काही नागरिक या बर्फाचा आनंद घेत आहेत, काहीजण उंच बर्फाच्या ढिगाऱ्यांवरून खाली उड्या मारून आनंद लुटतानाही दिसत आहेत. प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी सतत पडणाऱ्या बर्फामुळे त्यात अडथळे येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT