वॉशिंग्टन : सप्टेंबर 2023 मधील प्रत्यक्षदर्शींच्या अहवालावर आधारित हा फोटो असून आकाशात अचानक प्रकटलेल्या 130-195 फूट लांबीच्या लंबवर्तुळाकार कांस्य धातूच्या वस्तूचे एफबीआय लॅबने तयार केलेले ग्राफिकल ओव्हरले चित्रण. File Photo
आंतरराष्ट्रीय

UFO files release | यूएफओच्या दुर्मीळ फाईल्स प्रथमच सार्वजनिक

पेंटागॉनच्या निर्णयाने नवे कोडे उलगडण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी सी : अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हणजेच पेंटागॉनने शुक्रवारी ‘अनआयडेंटीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस् (यूएफओ) संदर्भातील काही दुर्मीळ फाईल्स प्रसिद्ध केल्या आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे या आत्तापर्यंत कधीही सार्वजनिक केल्या गेल्या नव्हत्या. पेंटॅगॉनने पारदर्शकतेच्या वचनबद्धतेचा हा भाग असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, याच वर्षाच्या सुरुवातीला पेंटागॉनने काही पत्रकारांना संरक्षण विभागाच्या नियमित माहितीप्रवाहातून बाहेर काढल्याने या खात्यावर गुप्तता पाळत असल्याचे आणि माहिती लपवण्याचे आरोप झाले होते. त्यामुळे आता यूएफओ फाइल्स जाहीर करण्यामागे केवळ वैज्ञानिक किंवा सुरक्षा कारण नसून प्रतिमानिर्मितीचाही एक राजकीय आणि संस्थात्मक पैलू असल्याचे मानले जात आहे.

यूएफओ म्हणजे अज्ञात उडत्या वस्तू. अधिकृत भाषेत त्याचा उल्लेख अनआयडेंटीफाईड अनॉमालस फिनॉमिना असा केला जातो. म्हणजेच आकाशात किंवा समुद्रात ज्यांची तात्काळ ओळख पटत नाही अशा घटना किंवा वस्तू अनेकदा दिसतात. गेल्या काही वर्षांत अमेरिकन लष्करातील वैमानिकांनी अनेक व्हिडिओ आणि रडार नोंदी सार्वजनिक केल्या आहेत. काही घटनांमध्ये अतिशय वेगाने हालचाल करणार्‍या आणि सामान्य विमानांच्या क्षमतेबाहेर वाटणार्‍या वस्तू दिसल्याचा दावा करण्यात आला होता.

गूढ, आकर्षणाचा बिषय

यूएफओबाबत अमेरिकेत दशकानुदशके एकीकडे गूढ आकर्षण असून दुसरीकडे संशयाचे वातावरण असे दोन्ही भाग राहिले आहेत. 1947 मध्ये न्यू मेक्सिकोतील रॉसवेल इन्सिडेंट नंतर हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. त्यानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेला सोव्हिएत युनियन च्या गुप्त हवाई तंत्रज्ञानाची भीती होती. त्यामुळे यूएफओच्या अनेक बातम्या आणि अहवाल प्रत्यक्षात गुप्त लष्करी चाचण्या किंवा प्रतिस्पर्धी देशांच्या तांत्रिक हालचाली असू शकतात, असे मानले जात होते.

पेंटागॉनतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुरुवातीच्या युएफओ फाइल्समधील चित्रे धूसर असून त्यामध्ये नेमके काय दिसते हे स्पष्ट होत नाही. आणखी फाइल्स टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जातील, असे सरकारने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT