लॉस एंजल्स : येथील बेव्हर्ली ग्रुव्हमधील बराकात आर्ट गॅलरीत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेली किमान 500 वर्षे जुनी बुद्धमूर्ती एका चोरट्याने अवघ्या 25 मिनिटांत लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
या मूर्तीची बाजारातील किंमत किमान साडेबारा कोटी रु. असल्याचे सांगण्यात आले. वज्रमुद्रेत बसलेल्या गौतम बुद्धांची ही चार फूट उंचीची ब्रांझची मूर्ती जगातील दुर्मीळ मूर्ती मानली जाते. जपानच्या इडो राजवटीच्या काळात 1603 ते 1867 या कालावधीत ही मूर्ती तयार करण्यात आली. ही मूर्ती बराकात गॅलरीत ठेवण्यात आली होती. शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास एका व्यक्तीने आत प्रवेश केला व ही मूर्ती उचलून ढकलगाडीत टाकली आणि नंतर ती आपल्या ट्रकमध्ये ठेवून तो पसार झाला.