Pakistan Quetta blast
क्वेटा : पाकिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरला आहे. आज (दि. ३०) अशांत बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे मोठा स्फोट झाला आणि लगेचच गोळीबार सुरू झाला. स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांच्या आणि इमारतींच्या खिडक्या फुटल्या. या भीषण स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत.
बलुचिस्तानचे आरोग्य मंत्री बख्त मुहम्मद काकर आणि आरोग्य सचिव मुजीब-उर-रहमान यांनी सिव्हिल हॉस्पिटल क्वेटा, बीएमसी हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटर येथे आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सर्व सल्लागार, डॉक्टर, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना त्वरित कर्तव्यावर बोलावण्यात आले आहे. बचाव पथकांनी सांगितलं की, जखमी आणि मृतांचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल क्वेटा येथे पाठवण्यात आले आहेत. स्फोटानंतर शहरात घबराटीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.