पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियावर मोठा हवाई हल्ला झाल्यास तो पाश्चिमात्य देशांनी केलेला हल्ला मानला जाईल. आम्ही या हल्ल्यास अण्वस्त्राने प्रत्युत्तर देवू, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी दिली आहे. दरम्यान, युक्रेनला पाश्चात्य देशांकडून क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा झाला आहे. या माध्यमातून युक्रेन रशियावर लांब अंतरावर हल्ला करू शकतात. मॉस्कोच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर पुतिन यांनी अण्वस्त्राने प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा पाश्चात्य देशांना दिला आहे.
अमेरिकेने युक्रेनला स्टॉर्म शॅडो क्रूड क्षेपणास्त्रचा पुरवठा केला आहे. याची मारक क्षमता 500 किमी आहे. युक्रेनने त्याचा वापर रशियन सैन्याविरुद्धच केला आहे. आता रशियावर मोठा हवाई हल्ला झाल्यास तो पाश्चात्य देशांनी केलेला हल्ला मानला जाईल. आम्ही या हल्ल्यास अण्वस्त्राने प्रत्युत्तर देवू, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली आहे
रशिया ही जगातील सर्वात मोठी अणुशक्ती आहे. रशियाकडे 6,372 अण्वस्त्रे आहेत. रशिया आणि अमेरिका या दोघांकडे जगातील 88 टक्के अण्वस्त्रे आहेत. रशियाची सध्याची आण्विक सिद्धांत 2020 मध्ये लागू झाली. यानुसार रशियाचे अस्तित्व धोक्यात असताना अण्वस्त्रांचा वापर करू शकतो. पुतिन यांनी नुकत्याच दिलेल्या धमकीमुळे संपूर्ण जगाचा तणाव वाढणार आहे.
रशिया आणि अमेरिका यांच्यात आण्विक शस्त्र नियंत्रण करार ( न्यू स्टार्ट करार) करार झालेला आहे. हा एक मोठा आण्विक शस्त्र नियंत्रण करार 2026 मध्ये संपणार आहे. रशियाला भविष्यातील कोणत्याही करारात युरोपातील आण्विक शक्ती ब्रिटन आणि फ्रान्सचा समावेश करायचा आहे. न्यू स्टार्ट कराराच्या बदलीबाबत क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, आण्विक शस्त्र नियंत्रण करार २०२६ मध्ये संपुष्टात येत आहे. "अमेरिकेकडून आम्हाला अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही; पण तडजोड नक्कीच आवश्यक आहे. यावर चर्चा लवकर सुरू व्हायला हवी."