Nuclear Briefcase President अमेरिका, रशिया आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष एकाच टेबलावर एकत्र येण्यासाठी यंदाची आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (APEC) शिखर परिषदेची बैठक महत्वाची ठरली. या परिषदेच्या इतिहासात या तिन्ही महासत्तांचे प्रमुख पहिल्यांदाच एकत्र आले. या बैठकीत तिन्ही देशांनी शांततेचा जाहिरनामा मंजूर केला. अण्वस्त्र युद्धामुळे कोणाचेही भले होणार नाही हे या चर्चेचे फलीत होते. तरीही या या बैठकीदरम्यान पुतिन यांच्यासोबत दिसलेल्या एका काळ्या ब्रीफकेसची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. ही ब्रीफकेस म्हणजे अण्वस्त्र टाकण्याचे बटन असल्याचा अनेकांचा कयास असतो. तर जाणून काय आहे याचे रहस्य
रहस्यमयी काळ्या ब्रीफकेसचे गुपित काय?
रशियाच्या सरकारी टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत चालणाऱ्या एका नौदल अधिकाऱ्यावर झूम केले. यावेळी त्या अधिकाऱ्याच्या हातात एक काळी ब्रीफकेस होती. त्याकडे बोट दाखवत त्या रिपोर्टने म्हटले की "हीच ती 'न्यूक्लियर ब्रीफकेस' आहे." रशियात या ब्रीफकेसला 'चेगेट (Cheget)' असे म्हटले जाते."
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडेही अशीच एक विशेष बॅग असते, जिला 'न्यूक्लियर फुटबॉल (Nuclear Football)' म्हटले जाते आणि ती नेहमी त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्याकडे असते. मात्र, चीनमधील शेन्झेन येथे सुरू असलेल्या या परिषदेत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत अद्याप अशी कोणतीही बॅग दिसलेली नाही.
काळी ब्रीफकेस म्हणजे अणुबॉम्बचा रिमोट कंट्रोल आहे का?
पुतिन यांच्यासोबत दिसलेली ही ब्रीफकेस केवळ शक्तिप्रदर्शनाचे माध्यम आहे की खरोखरच यातून नेते कधीही अणुहल्ल्याचे आदेश देऊ शकतात? असाही प्रश्न उपस्थित होतो पण यामागे अनेक तांत्रीक गोष्टी असतात.
लष्करी कमांडशी थेट संपर्क: न्यूक्लियर ब्रीफकेस ही एक विशेष प्रकारे तयार केलेली बॅग असते, जी थेट देशाच्या लष्करी कमांड सिस्टीमशी जोडलेली असते. याच्या मदतीने राष्ट्रप्रमुख जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून अणुहल्ल्याचा आदेश देऊ शकतात.
कुठूनही देतात आदेश : राष्ट्राध्यक्ष विमानात असोत, एखाद्या शिखर परिषदेत सहभागी झालेले असोत किंवा हॉटेलमध्ये झोपलेले असोत; ते या ब्रीफकेसच्या मदतीने कधीही हल्ला करण्याचे किंवा प्रत्युत्तर देण्याचे आदेश देऊ शकतात.
शस्त्रूवर राहतो वचक :शत्रूला रोखण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आपल्या हल्ल्याला समोरचा देश तात्काळ अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ शकतो, याची भीती शत्रूच्या मनात राहते आणि त्यामुळे अणुयुद्ध टळण्यास मदत होते.
न्यूक्लियर ब्रीफकेस तयार केल्या गेल्या
अमेरिका आणि रशियाच्या या यंत्रणा 'शीतयुद्धाच्या' (Cold War) काळात विकसित केल्या गेल्या. त्या काळात दोन्ही महासत्तांच्या नेत्यांसमोर अशी परिस्थिती तयार झाली तर त्यांना अत्यंत कमी वेळेच्या सूचनेवर अणुहल्ल्याचा निर्णय घ्यावा लागेल.
एका बटणावर अणुबाँम्ब टाकता येतो का
अनेकदा चित्रपटात दाखवले जाते की एक लाल बटण दाबला की अण्वस्त्रधारी मिसाईल डागले जाते. पण हे सत्य नाही. कोणत्याही नेत्याचा आदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि एका प्रचंड मोठ्या कम्युनिकेशनची गरज असते. अंतिम निर्णय राष्ट्रप्रमुखांचाच असला, तरी त्याची अंमलबजावणी अनेक टप्प्यांतून होते. अणुबॉब्ट टाकणे इतके सोपे नसते
कोण - कोणत्या देशांकडे आहेत अशा ब्रीफकेस
'स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' (SIPRI) च्या मते, जगात ९ देशांकडे अण्वस्त्रे आहेत. यापैकी अमेरिका आणि रशियाच्या ब्रीफकेसबद्दल सर्वाधिक माहिती उपलब्ध आहे. इतर देशांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
भारत : भारत सरकारच्या धोरणानुसार, केवळ 'न्यूक्लियर कमांड अथॉरिटी'ची 'पॉलिटिकल कौन्सिल'च अण्वस्त्रांच्या वापराची परवानगी देऊ शकते. या कौन्सिलचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. मात्र, पंतप्रधानांसोबत असे कोणतेही विशेष उपकरण असते की नाही, हे गुप्त ठेवण्यात आले आहे.
चीन : चीनचे धोरण 'प्रथम वापर न करण्याचे' आहे. म्हणजेच, जोपर्यंत त्यांच्यावर कोणी अणुहल्ला करत नाही, तोपर्यंत चीन अण्वस्त्र वापरणार नाही. शी जिनपिंग सोबत ब्रीफकेस ठेवतात की नाही, हे अस्पष्ट आहे.
फ्रान्स : फ्रान्समध्ये अणुहल्ल्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांकडे असतो. २०१२ मध्ये निकोलस सरकोजी यांनी पद सोडताना अण्वस्त्रांचे गुप्त कोड नवीन राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांच्याकडे सुपूर्द केले होते.
इंग्लड : 'हाऊस ऑफ कॉमन्स लायब्ररी'नुसार, ब्रिटनमध्ये केवळ पंतप्रधानच अण्वस्त्र वापरण्याचे आदेश देऊ शकतात. प्रत्येक नवीन पंतप्रधानाला चार हस्तलिखित पत्रे लिहावी लागतात, जी अण्वस्त्रसज्ज पाणबुड्यांच्या कमांडर्सना दिली जातात. अणुहल्ल्यात जर सरकार पूर्णपणे नष्ट झाले, तर पुढे काय करायचे, याचे निर्देश या पत्रात असतात.