ढाका; वृत्तसंस्था : बांगला देशच्या नॅशनल सिटीझन पार्टी (एनसीपी)च्या वरिष्ठ संयुक्त सदस्य सचिव डॉ. तस्नीम जारा यांनी सांगितले की पक्षाचे सदस्य सचिव अख्तर हुसेन यांच्यावर अमेरिकेत हल्ला झाला.
पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यावर पक्षाचे सदस्य सचिव अख्तर हुसेन यांच्यावर हल्ला झाला. त्यांच्यावर अंडी फेकली आणि त्यांना शिवीगाळ करण्यात आली. ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, पोस्टसोबत दिलेल्या एका व्हिडीओमध्ये अख्तर यांच्या पाठीवरून अंड्याची पिवळी जर्दी ओघळताना दिसते, तर इतर लोक त्यांना हल्लेखोरांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.