Prof. G. D. Yadav Honoured | प्रा. जी. डी. यादव यांचा अमेरिकेत सन्मान; पुत्र विक्रमादित्य यांना लँगर फेलोशिप 
आंतरराष्ट्रीय

Prof. G. D. Yadav Honoured | प्रा. जी. डी. यादव यांचा अमेरिकेत सन्मान; पुत्र विक्रमादित्य यांना लँगर फेलोशिप

पुढारी वृत्तसेवा

मिनियापोलिस : ज्येष्ठ संशोधक प्रा. जी. डी. यादव यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स (एआयसीई) यांच्या २०२६ च्या वार्षिक अधिवेशनात प्रतिष्ठेचे पी. व्ही. डॅन्कवर्ट्स स्मृती व्याख्यान देण्याचा बहुमान प्राप्त झाला. याच अधिवेशनात त्यांचे पुत्र विक्रमादित्य यांना लँगर फेलोशिप प्रदान करण्यात आली.

जागतिक रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या व्याख्यानांमध्ये डॅन्कवर्ट्स स्मृती व्याख्यानाचा समावेश होतो. प्रा. यादव यांनी ‘नव्या संदर्भात अभियांत्रिकी विज्ञान : उत्प्रेरण, परिपत्र अर्थव्यवस्था, शाश्वतता आणि निव्वळ ऋण उत्सर्जनाच्या भविष्याकडे नेणारे आण्विक मार्ग’ या विषयावर व्याख्यान दिले.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रा. यादव यांचे सुपुत्र प्रा. विक्रमादित्य जी. यादव, यांना याच अधिवेशनात २०२६ चे लँगर प्राइझ फेलो म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय संशोधन आणि नवोन्मेषी कार्याची दखल घेऊन त्यांना ६०,००० अमेरिकी डॉलरचे प्रतिष्ठित पारितोषिक प्रदान करण्यात आले. ते कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. जी. डी. यादव हे सीएसआयआरच्या भटनागर फेलोशिपचे मानकरी, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे माजी कुलगुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT