पुढारी ऑनलाईन डेस्क : धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली 'उमराह' व्हिसा घेवून पाकिस्तानातून येणाऱ्या भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे सौदी अरेबिया हैराण झाला आहे. या समस्येवर तीव्र चिंता व्यक्त करत पाकिस्तानमधील भिकारयांना थांबावा त्यांच्यावर कारवाई करा, अशी विनंती सौदी अरेबिया सरकारने पाकिस्तान सरकाला केले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर त्याचा पाकिस्तानी उमराह आणि हज यात्रेकरूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा इशाराही पाकिस्ताना दिला आहे.
पाकिस्तानमधील दैनिक एक्सप्रेस ट्रिब्यूनने धार्मिक व्यवहार मंत्रालयातील सूत्रांच्या हवाला देत दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, 'उमराह'च्या नावाखाली पाकिस्तानातून येणाऱ्या भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर सौदी अरेबियाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. पाकिस्तान भिकाऱ्यांना रोखू शकत नसेल तर त्याचा परिणाम पाकिस्तानी उमराह आणि हज यात्रेकरूंवर होऊ शकतो, असा इशाराही सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी दिला आहे. पाकिस्तानी भिकाऱ्यांना उमरा व्हिसाच्या अंतर्गत आखाती देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
पाकिस्तानी भिकारी उमराहाच्या नावाखाली आखाती देशात जातात. बहुसंख्य लोक उमराह व्हिसावर सौदी अरेबियाला जातात आणि नंतर भीक मागण्याशी संबंधित कामात गुंततात.सौदी अरेबियात भिकारी पाठविण्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील माफियांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी सौदीचे राजदूत नवाफ बिन सईद अहमद अल-मलिकी यांच्याशी झालेल्या बैठकीत दिली होती. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला या संदर्भात कारवाई आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा खराब झाली असल्याचेही गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी स्पष्ट केले आहे.
परदेशी पाकिस्तानी सचिव अर्शद मेहमूद यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की, अनेक आखाती देशांनी परदेशी पाकिस्तानींच्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः त्याच्या कामातील नैतिकता, त्याची वागणूक आणि गुन्हेगारी कारवायांमधील पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग हा चिंता विषय ठरला आहे. पाकिस्तानच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशात पकडले गेलेले 90 टक्के भिकारी पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानमध्ये अनेकदा भिकाऱ्यांशी संबंधित टोळ्या पकडल्या गेल्या आहेत.
पाकिस्तानी भिकारी झियारत (तीर्थयात्रे) च्या नावाखाली मध्य पूर्वेकडे प्रवास करतात. बहुतेक लोक उमराह व्हिसावर सौदी अरेबियाला भेट देतात आणि नंतर भीक मागतात, असे परदेशी पाकिस्तानी सचिव झीशान खानजादा यांनी मागील वर्षीस्पष्ट केले होते. आता या प्रश्नी पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने "उमरा कायदा" आणण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली पाकिस्तानातून परदेशात जाणार्या नागरिकांना सुविधा देणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींचे नियमन करणे आणि त्यांना कायदेशीर देखरेखीखाली आणण्यात येणार आहे.