Philippines earthquake | फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप; ३२ जणांचा मृत्यू 
आंतरराष्ट्रीय

Philippines earthquake | फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप; ३२ जणांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

जनरल सँतोस (फिलिपाईन्स) : वृत्तसंस्था : दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंदानाओ बेटाजवळ सोमवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान ३२ जणांचा मृत्यू झाला असून १३४ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपानंतर अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, परंतु ६ तासांनंतर तो मागे घेण्यात आला. सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू सारंगानी प्रांताच्या किनारपट्टीपासून २० किलोमीटर अंतरावर होता. या धक्क्यामुळे जनरल सँतोस शहरातील अनेक बहुमजली इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. एका फास्ट फूड रेस्टॉरंटची इमारत कोसळतानाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ स्थानिक प्रशासनाने जारी केला आहे, त्यामध्ये नागरिक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. सुदैवाने शाळा नुकत्याच सुरू झाल्या असल्या तरी अनेक मुले वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

भूकंपानंतर परिसरात २०० हून अधिक ‘आफ्टरशॉक्स’ (भूकंपाचे छोटे धक्के) जाणवले असून, त्यातील ९ धक्के ६.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते. यामुळे जनरल सँतोस शहरातील वीज आणि पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT