पुढारी ऑनलाईन डेस्कः गेल्या पाच आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पहिल्यांदाच जनतेला दर्शन दिले आहे. व्हॅटिकन सिटीतील सेंट पिटर स्वेअर येथे जमलेल्या लोकांना रविवारी त्यांनी संबोधित केले. व्हिलचेअर बसून याठिकाणी त्यांचे आगमन झाले त्यांना ऑक्सिजन पाईप लावली होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे.
८८ वर्षाचे असलेले पोप यांच्या प्रकृतीच्या अनेक तक्रारी आहेत. रोममधील जिमिली हॉस्पिटल येथे त्यांच्यावर गेले महिनाभर उपचार सुरु होते. त्यांना दुहेरी न्युमोनिया झाला होता. उपचारदरम्यान २३ मार्च रोजी त्यांचे अल्पकाळ दर्शन झाले होते. त्यानंतर परत त्यांच्यावर उपचार सुरु ठेवण्यात आले.
व्हॅटिकनमधील कॅथेलिक चर्चच्या ज्युबिली सेलिब्रेशनला लोक जमले होते. समारोप संपत असताना पोप हे त्याठिकाणी आले. त्यांनी उपस्थितांना ‘हॅपी संडे एव्हरीवन’ अशा शुभेच्छा दिल्या त्यांनर सर्वांचे आभार मानले. त्यांना बोलताना त्रास होत असल्याचे उपस्थितांच्या लक्षात येत होते.
१४ फेब्रुवारीला त्यांची छाती भरली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी दुहेरी न्युमोनिया झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. काही काळ त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. तरुणपणी एका आजारपणात त्यांच्या फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकण्यात आला होता, त्यामुळे दुहेरी न्युमोनियाची स्थिती त्याच्यासाठी विशेषतः गंभीर होती.