PM’s Modi New Zealand visit | पंतप्रधान मोदी न्यूझीलंडमध्ये 
आंतरराष्ट्रीय

PM’s Modi New Zealand Visit | पंतप्रधान मोदी न्यूझीलंडमध्ये

विमानतळावर स्वागत; मुक्त व्यापार करार चर्चेच्या केंद्रस्थानी

पुढारी वृत्तसेवा

ऑकलंड; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाले. या दौऱ्यात ते न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा करणार आहेत. प्रामुख्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार हा विषय या दौऱ्यात केंद्रस्थानी असणार आहे.

पंतप्रधान मोदी हे या दौऱ्यात सुमारे चाळीस हजार भारतीयांना संबोधित करणार आहेत. येथील विमानतळावर आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदींचे स्वागत खुद्द लक्सन यांनी केले. मुख्य म्हणजे तब्बल चाळीस वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला दिलेली ही ऐतिहासिक भेट ठरली आहे.

मोदी म्हणाले की, त्यांच्या न्यूझीलंड दौऱ्यामुळे भारताचे 'ॲक्ट ईस्ट पॉलिसी', 'महासागर व्हिजन' तसेच मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिकबाबतचा दृष्टिकोन अधिक मजबूत होईल. न्यूझीलंडच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान, ते आर्थिक, व्यापारी आणि व्यावसायिक संबंध अधिक वाढवण्याच्या मार्गांवर लक्सॉन यांच्याशी चर्चा करणार आहेत. हा दौरा त्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरुवात न्यूझीलंड सरकारसोबतच्या द्विपक्षीय चर्चेने होईल. यावेळी दोन्ही देश मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देतील.

दोन मुख्य कार्यक्रमांत सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यावसायिक कार्यक्रमात आणि नंतर एका क्रीडा कार्यक्रमात सहभागी होतील. विशेष म्हणजे मोदी यांच्या स्वागतासाठी भारतीय समुदायाने ‘किया ओरा मोदी’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT