ब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाकिया) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी ऐतिहासिक ब्रातिस्लाव्हा कॅसल येथे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी स्वागत केले. -
आंतरराष्ट्रीय

PM Narendra Modi | स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी

रॉबर्ट फिको यांना भारत भेटीचे आमंत्रण

पुढारी वृत्तसेवा

ब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाकिया) : भारत व स्लोव्हाकियामधील संबंध आणखी दृढ करण्यात येतील. दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक भागीदारी वाढविण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्पष्ट केले. सध्या ते स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर आहेत. १९९३ मध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या या मध्य युरोपीय देशाला एखाद्या भारतीय नेत्याने दिलेली ही पहिलीच भेट आहे.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. तसेच फिको यांनी हे आमंत्रण जाहीरपणे स्वीकारल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी सोमवारी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली आणि भारत व स्लोव्हाकियामधील संबंधांचा दर्जा वाढवून ते सर्वसमावेशक भागीदारीत बदलले. स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लाव्हा येथे पंतप्रधान फिको यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांमधील एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद होत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी आम्ही हे संबंध सर्वसमावेशक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर गेले असून, आपल्या मैत्रीचा परस्परांना फायदा होईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.

सहकार्याच्या नव्या क्षेत्रांवर चर्चा

भारत आणि स्लोव्हाकियामधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेताना मोदी आणि फिको यांनी व्यापार व गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा, तंत्रज्ञान व नवोपक्रम, अंतराळ आणि अणुऊर्जा, शिक्षण व संस्कृती, तसेच टॅलेंट मोबिलिटी आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील परस्पर संबंध यांसह प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्याच्या नव्या संधींवर चर्चा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT