बीजिंग : शांघाय परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चीनमध्ये आगमन झाले आहे. यावेळी त्यांचे लाल गालिचा अंथरून भव्य स्वागत करण्यात आले.  File Photo
आंतरराष्ट्रीय

PM Modi China visit | पंतप्रधान मोदींना चीनमध्ये रेड कार्पेट

अमेरिकेला इशारा; शांघाय परिषदेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफवरून वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे सात वर्षांनंतर चीनमध्ये दाखल झाले आहेत. चीनने पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरून त्यांचे भव्य स्वागत केले आहे. या दौर्‍याला भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्व प्राप्त झाले असून चीनच्या या कृतीकडे अमेरिकेला दिलेला एक सूचक इशारा म्हणून पाहिले जात आहे.

पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणार्‍या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनच्या तियानजिन शहरात पोहोचले आहेत. या दौर्‍यादरम्यान रविवारी पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी द्विपक्षीय बैठक अमेरिकेसाठी एक मोठा राजनैतिक धक्का मानली जात आहे.

मोदी-जिनपिंग भेटीवर जगाचे लक्ष

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात रविवारी शांघाय परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठक निश्चित झाली आहे. तब्बल सात वर्षांनंतर दोन्ही नेते चीनमध्ये समोरासमोर भेटणार आहेत.

कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन आपले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक घेत आहेत. या बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT