नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. -
आंतरराष्ट्रीय

G7 Summit 2026 | मोदी, ट्रम्प यांच्यात होणार चर्चा; जी-७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान फ्रान्स, स्लोव्हाकिया दौऱ्यावर रवाना

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्‍था : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी-७ शिखर परिषदेदरम्यान फ्रान्समध्ये भेट होणार आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये द्विपक्षीय चर्चाही होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय असलेल्या ‘व्हाईट हाऊस’ने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे पंतप्रधान मोदींसह अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेणार असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. त्यासाठी मोदी शनिवारी रवाना झाले.

या दौऱ्यात ट्रम्प हे यजमान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी, संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठका करणार आहेत.

व्हाईट हाऊसची माहिती

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठका घेतील. एव्हियन येथून माघारी परतण्यापूर्वी ते ‘इनोव्हेशन आणि एआय’ या विषयावर जी-७ नेते, सहयोगी देश आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत ‘वर्किंग लंच’मध्ये सहभागी होतील आणि सरतेशेवटी फ्रान्सचा निरोप घेण्यापूर्वी ते व्हर्सायच्या ऐतिहासिक राजवाड्यात (Palace of Versailles) राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत रात्रीचे भोजन करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT