अमेरिकेत धावपट्टीवरून घसरलेले विमान थेट पाण्यात पडले! Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेमध्ये विमान धावपट्टीवरून घसरले अन् थेट पाण्यात कोसळले (पाहा Video)

Airplane Accident in America | विमान अपघातात वैमानिकासह ५ जण जखमी

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत आणखी एका विमानाचा अपघात झाला आहे. सुदैवाने विमानातील प्रवाशी बचावले. सोमवारी (दि.०७) दक्षिण ओरेगॉनमध्ये एक छोटे कॉर्पोरेट विमान धावपट्टीवरून घसरून पाण्यात कोसळले, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात पाच जण जखमी झाले. विमानतळ प्रशासनाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, नैऋत्य ओरेगॉन विमानातील पायलट आणि चार प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. या घटनेचे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे.

विमानतळाने व्यवस्थापनाने सांगितले की, विमानातील पायलट आणि चार प्रवाशांना वाचवण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सोमवारी संध्याकाळी दोन जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे विमानतळाने सांगितले. एकाला दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्याची तपासणी सुरू आहे. पाचव्या व्यक्तीला पुढील उपचारांसाठी परिसरातील एका रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.

Airplane Accident in America | विमान युटाहून ओरेगॉनला येत होते

विमानतळाने सांगितले की, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाकडून परवानगी मिळाल्यानंतर २०१९ होंडा HA-४२० पाण्यातून काढून टाकण्यात आले. हे विमान सेंट जॉर्ज, युटाहून ओरेगॉनला येत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT