पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण चीन समुद्रातील दुसऱ्या थॉमस शोल या सागरी क्षेत्रावरुन गेल्या काही महिन्यांपासून फिलीपाइन्स आणि चीननमधील तणाव वाढला आहे. दरम्यान, आज (दि.११ ऑगस्ट) दक्षिण चीन समुद्रातील पाण्यात चीनच्या हवाई दलाने केलेली घुसखोरीचा फिलीपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी तीव्र निषेध केला. चीनची कृती ही “अयोग्य, बेकायदेशीर आणि बेपर्वा” असल्याचे त्यांनी म्हटलं असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिलं आहे.
फिलीपाइन्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे मार्कोस यांनी २०२२ मध्ये स्वीकारली. यानंतर दक्षिण चीन समुद्रातील दुसऱ्या थॉमस शोलवरुन संघर्ष वाढला आहे. चिनी विमानांनी फिलीपाईन्स नौदल आणि तटरक्षक जहारांच्या विरोधात धोकादायक कृत्य केले. चिनी सैन्याच्या दक्षिणी कमांडने आमच्या हवाई क्षेत्रात “बेकायदेशीरपणे घुसखोरी” केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच चीनला समुद्रासह आमच्या हवाई क्षेत्रात चीनने जबाबदारी वागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मार्कोस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रेसिडेंशियल कम्युनिकेशन्स ऑफिसने पोस्ट केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “ आमच्या हवाई क्षेत्रात अस्थिरता निर्माण होऊ शकते हे आधीच चिंताजनक आहे. दरम्यान, मार्कोस यांच्या विधानावर मनिलामधील चिनी दूतावासाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही.
दक्षिण चीन समुद्रातील स्कारबोरो शोल हे आशियातील सर्वात विवादित सागरी क्षेत्र आहे. या क्षेत्रावरील सार्वभौमत्व आणि मासेमारीच्या अधिकारांवर फिलीपाइन्स आणि चीननमधील तणाव वाढला आहे. फिलीपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि ब्रुनेई यांनी दावा केलेल्या या भागांसह, जवळजवळ संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीन दावा सांगते. येथील
वार्षिक व्यापार हा तब्बल तीन ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. चीनने हेगमधील लवादाच्या स्थायी न्यायालयाचा 2016 चा निर्णय नाकारला आहे.
फिलिपाइन्स हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेला फिलिपाईन्स हा लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. या देशाच्या पश्चिमेला दक्षिण चीन समुद्र आहे , ज्याला वेस्टर्न फिलीपीन समुद्र असेही म्हटलं जातं. हा देश नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे आणि जगातील सर्वात जैवविविध क्षेत्रांपैकी एक आहे. दक्षिण चीन समुद्रातील दुसऱ्या थॉमस शोलवरुन गेल्या काही महिन्यांपासून फिलीपाईन्स आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.
29 ऑगस्ट २०२३ रोजी चीनने नकाशा जारी करून अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला आपला हिस्सा घोषित केले. याशिवाय त्यांनी त्यांच्या परिसरात तैवान आणि दक्षिण-चीनचा समुद्रही दाखवला. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने नवा नकाशा ट्विटरवर (पूर्वीचे ट्विटर) दुपारी ३:४७ वाजता पोस्ट केला होता. चीनने म्हटले होते की, आमच्या नकाशाची 2023 आवृत्ती जारी करणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे.