आंतरराष्ट्रीय

Pakistan Paramilitary HQ Attack : पाकिस्तानमधील निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला

तीन ठार, आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिल्‍यानंतर अन्‍य हल्‍लेखोरांनी केला अंदाधूंद गोळीबार

पुढारी वृत्तसेवा

Pakistan Paramilitary HQ Attack

पेशावर: येथील निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर आज (दि.२४) सकाळी आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान ठार आणि किमान पाच जण जखमी झाले आहेत, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.

मुख्यालयाजवळ घडवून आणला आत्‍मघाती स्‍फोट

निमलष्करी दलाच्या मुख्यालयाजवळसकाळी ८ वाजताच्या सुमारास सदर-कोहाट रस्त्यावर हा हल्ला झाला. मुख्यालयाच्या गेटवर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. त्यानंतर अन्‍य हल्‍लेखोरांनी अंदाधूंद गोळीबारही केला. पेशावरमधील अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर परिसर रिकामा करण्यात आला.

चकमकीत हल्‍लेखोर ठार

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हल्ल्यात सहभागी असलेले आत्मघातकी हल्लेखोर ठार झाले आहेत. या घटनेत तीन पोलिस कर्मचारी ठार झाले आणि इतर दोघे जखमी झाले. दुसऱ्या हल्लेखोराने मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तथापि, सुरक्षा दलांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि बचाव कार्य सुरू केले.

पेशावरमधील सरकारी रुग्‍णालयात आणीबाणी जाहीर

दरम्यान, पेशावरमधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या लेडी रीडिंग रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सहा जखमींना दाखल करण्यात आले आहे. दरम्‍यान, पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांच्यातील शांतता कराराचा भंग झाला. यानंतर खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT