earthquake in peru
पेरूमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे.  File Photo
आंतरराष्ट्रीय

Peru Earthquake | पेरू हादरला: भूकंपाच्या धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पेरूमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका वर्तविला आहे. अतिकिपा जिल्ह्यापासून ८.८ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. शुक्रवारी (दि.२८) मध्य पेरूच्या किनारपट्टीवर ७.२ तीव्रतेचा भूकंप झाला, त्यामुळे काही किनारी भागात त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता आहे, असे यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे.

Summary

  • पेरूमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप

  • अटिक्विपा जिल्ह्यापासून ८ किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू

  • किनारी भागात त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता

समुद्रकिनाऱ्यांवर तीन मीटर उंचीच्या लाटा

पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने यापूर्वी कोणताही धोका नसल्याचे सांगितले होते. भूकंपानंतर काही समुद्रकिनाऱ्यांवर तीन मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

पेरू भूकंपाने हादरला

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार आज सकाळी ११ वाजून ६ मिनिटांनी हा भूकंप झाला. ७. २ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंपाचा केंद्रबिंदू पेरूच्या अटिक्विपा जिल्ह्यापासून ८ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपानंतर पेरूमध्ये किती जीवित आणि मालमत्तेची हानी झाली, याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र त्सुनामीबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी १६ जूनरोजी पेरूमध्ये ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

SCROLL FOR NEXT