Pakistan Operation Ghazab-Lil-Haq  file photo
आंतरराष्ट्रीय

Pakistan-Afghanistan War: विनाशाला सुरूवात? पाकिस्तानच्या 'ऑपरेशन गजब-लील-हक' चा खरा अर्थ काय?

Pakistan Operation Ghazab-Lil-Haq: पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध ‘गजब-लील-हक’ नावाचे लष्करी अभियान सुरू केल्याचा दावा केला आहे. या ऑपरेशनच्या नावावरून सध्या जगभरात मोठी चर्चा सुरू आहे.

मोहन कारंडे

Pakistan Operation Ghazab-Lil-Haq

इस्लामाबाद: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध ‘गजब-लील-हक’ नावाचे लष्करी अभियान सुरू केल्याचा दावा केला आहे. या ऑपरेशनच्या नावावरून सध्या जगभरात मोठी चर्चा सुरू असून, या शब्दाचा नेमका अर्थ आणि त्यामागची पाकिस्तानची रणनीती काय आहे, हे जाणून घेऊया.

'गजब-लील-हक'चा अर्थ काय?

तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानने या मोहिमेला दिलेले नाव केवळ तांत्रिक नसून त्याला धार्मिक आणि लष्करी आधार आहे. ‘गजब-लील-हक’ हा अरबी भाषेतील शब्दसमूह असून त्याचा अर्थ खालीलप्रमाणे होतो:

गजब (Ghazab): प्रचंड संताप किंवा ईश्वरी प्रकोप.

लिल (Lil): साठी.

हक (Haq): सत्य किंवा न्याय.

म्हणजेच, ‘सत्य आणि न्यायासाठी ईश्वरी प्रकोप’ असा याचा अर्थ होतो. या नावाच्या माध्यमातून पाकिस्तानला असे दाखवायचे आहे की, त्यांचा हा हल्ला पूर्णपणे न्यायासाठी असून ते सत्याच्या रक्षणासाठी तालिबानवर हल्ला करत आहेत.

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार सीमावर्ती भागात विनाकारण गोळीबार करत असून 'टीटीपी' सारख्या दहशतवादी गटांना आश्रय देत आहे, असा आरोप पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि मंत्री अताउल्ला तरार यांनी केला आहे. पाकिस्तानने आता आपली संयमाची सीमा ओलांडली असल्याचे त्यांनी म्हटले असून, याला 'ओपन वॉर' असे संबोधले आहे. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश असा की, तालिबानला इशारा देणे आहे, पाकिस्तान आता केवळ सीमेवर रक्षण करणार नाही, तर अफगाणिस्तानच्या आत घुसून हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांना दाखवायचे आहे.

न्यायाचा संघर्ष की विनाशाचा मार्ग?

पाकिस्तान या मोहिमेला 'न्यायासाठी उचललेले पाऊल' म्हणत असला तरी, यामुळे देशात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील दशकांपासून असलेला तणाव आता सर्वात घातक वळणावर आला आहे. आता प्रश्न हाच उरतो की, हा संघर्ष येथेच थांबणार की याचे रूपांतर एका मोठ्या युद्धात होऊन भीषण विनाश ओढवणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT