इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांची न्यायालयाने या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे X
आंतरराष्ट्रीय

इस्लाम विरोधी विवाह | इम्रान खान, त्यांच्या पत्नी निर्दोष; दाम्पत्य लवकरच तुरुंगाबाहेर?

Imran Khan & Bushra Bibi Iddat Case प्रकरणी फेब्रुवारीमध्ये झाली होती अटक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्न करताना इस्लामिक प्रथेचे पालन केले नाही म्हणून गुन्हा नोंद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांची न्यायालयाने या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. सध्या इम्रान खान यांच्याविरोधात दोषारोप असणारी ही एकमेव केस होती, त्यामुळे लवकरच तुरुंगातून मुक्त होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

इम्रान खान आणि बुशरा यांच्याविरोधातील तक्रार

३ फेब्रुवारी २०२४ला इम्रान खान (Imran Khan) आणि बुशरा बिबी (Bushra Bibi) यांना या प्रकरणी अटक झाली होती. इस्लामाबाद येथील न्यायालयाने खान दाम्पत्याला दोषी ठरवले होते. बुशार यांचे आधीचे पती खवर फरिद मनेका यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद झाला होता. इद्दतचा कालावधी संपण्यापूर्वी खान आणि बुशरा यांनी लग्न केल्याचे मनेका यांनी तक्रारीत म्हटले होते.

इस्लाममध्ये इद्दत म्हणजे काय?

इस्लामिक कायद्यानुसार घटस्फोटानंतर किंवा पतीच्या निधानंतर महिलेने दुसरे लग्न करण्यापूर्वी ४ महिना प्रतीक्षा करावी लागते. हा कालावधी इद्दत म्हणून ओळखला जातो.

इम्रान खान यांचे तिसरे लग्न

खान दाम्पत्याने या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायाधीश खान दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली. सध्या इम्रान खान तुरुंगात आहेत. इम्रान यांच्याविरोधात सध्या इतर गुन्हा नोंद नसल्याते ते तुरुंगातून मुक्त होतील, असे DAWN या वेबसाईटने म्हटले आहे.

इम्रान खान ऑगस्ट २०२३पासून विविध गुन्ह्यांमुळे तुरुंगात आहेत. खान आणि बुशरा बिबी यांचा विवाह २०१८मध्ये झाला. खान यांचा हा तिसरा विवाह आहे. तर बुशरा यांनी इम्रान खान यांच्याशी लग्न करण्यासाठी घटस्फोट घेतला होता. बुशरा यांना पहिल्या पतीपासून ५ मुले आहेत.

इम्रान खान यांनी स्थापन केलेल्या 'पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ' पक्षाच्या प्रवक्त्या गोहर खान यांनी इम्रान खान यांची तुरुंगातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT