पुढारी ऑनलाईन डेस्क : "तुम्ही तुमच्या मुलांना पाकिस्तानच्या निर्मितीची गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्या पूर्वजांना वाटायचे की आपण हिंदूंपेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत. आपल्या चालीरीती, आपला धर्म, आपली विचारसरणी, सर्वकाही त्यांच्यापेक्षा वेगळे आहे. आपण एक नाही तर दोन राष्ट्रे आहोत. आम्ही हिंदूपेक्षा वेगळे आहाेत. आपण पाकिस्तानच्या उभारणीसाठी खूप त्याग केले आहेत , अशा शब्दांमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख (Pakistan Army chief) जनरल सय्यद असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध विष ओकले. १३ लाखांचे भारतीय लष्कर आणि त्यांचं सर्व सुसज्ज शस्त्रसाठा जर आपल्याला घाबरवू शकत नाही. जगातील कोणतीही ताकद काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळं करू शकत नाही, अशी वल्गनाही त्यांनी केली.
ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये सय्यद असीम मुनीर म्हणाले, "पाकिस्तानच्या निर्मिती ही हिंदू आणि मुस्लिमांतील मूलभूत फरक असल्याने झाली आहे. आपल्या पूर्वजांचा विश्वास होता की जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये आपण हिंदूंहून वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे, आपले रीतिरिवाज वेगळे आहेत, आपली परंपरा, विचार, आकांक्षा हे सगळं हिंदूंपेक्षा वेगळं आहे. पाकिस्तानच्या निर्मितीची गोष्ट तुम्ही आपल्या मुलांना नक्की सांगितली पाहिजे. कृपया पाकिस्तानची ही कहाणी कधीही विसरू नका. तुमच्या भावी पिढ्यांना हे सांगा. जेणेकरून त्यांना पाकिस्तानशी असलेले त्यांचे नाते जाणवेल. ती कधीही कमकुवत नसावी, मग ती तिसरी पिढी असो, चौथी पिढी असो किंवा पाचवी पिढी असो."
१३ लाखांचे भारतीय लष्कर आणि त्यांचं सर्व सुसज्ज शस्त्रसाठा जर आपल्याला घाबरवू शकत नाही, अशा वल्गना करत पाकिस्तानच्या शत्रूंना वाटते का की, फक्त १५०० दहशतवादी देशाचे भाग्य बदलतील. पण दहशतवादी पाकिस्तानी लष्कराला पराभूत करू शकतील का? बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करणार आाहोत. दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान व पाकिस्तानचं नुकसान करु शकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. तसेच पाकिस्तान कधीही काश्मीर वेगळे करू शकत नाही. कोणतीही शक्ती काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळे करू शकणार नाही, अशी वल्गनाही त्यांनी केली.